एक्स्प्लोर
बेळगावात 'येळ्ळूर साहित्य संमेलन', संयुक्त महाराष्ट्राची मागणी
बेळगावात येळ्ळूर साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्राची मागणी करण्यात आली.
![बेळगावात 'येळ्ळूर साहित्य संमेलन', संयुक्त महाराष्ट्राची मागणी yallur sahitya sammelan in begaon बेळगावात 'येळ्ळूर साहित्य संमेलन', संयुक्त महाराष्ट्राची मागणी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/02/03024715/belgao.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बेळगाव : आपल्या मराठी भाषेचे जतन करण्यासाठी प्रत्येकाने मातृभाषेतून शिक्षण घेणे आवश्यक आहे. सध्या सगळीकडे आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्याचे फॅड आले आहे. हे इंग्रजीचे फॅड धोकादायक आहे. मातृभाषेतील शिक्षण परिपूर्ण आहे, असे उदगार निवृत्त पोलीस महासंचालक उद्धव कांबळे यांनी काढलेत. येळ्ळूर येथे आयोजित करण्यात आलेल्या 15व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
समाजात साहित्य हे जुळवा जुळवीची भूमिका घेते. साहित्य सोपे आणि निर्विघ्न नसून त्यात द्वंद्व असतं. या द्वंद्वातून नवीन साहित्याची निर्मिती होते. साहित्य हे कधीच निरागस नसते. साहित्य हे द्वंद्व घेऊनच येते. द्वंद्व लक्षात घेतले नाही तर भाबडेपणा निर्माण होतो, असेही उद्धव कांबळे म्हणाले. साहित्य हे ज्ञानाकडे नेते, मुक्यांना वाणी देते, पर्वत ओलांडण्याची क्षमता देते. अभिव्यक्तीची संधी देखील साहित्यच देते. साहित्याची जपणूक ही महत्त्वाची आहे. असे विचारही येळ्ळूर संमेलन अध्यक्ष उद्धव कांबळे यांनी मांडले.
कलेसाठी बेळगावात कानडी, मराठींनी एकत्र यावं : जितेंद्र जोशी
बेळगावची मागणी -
प्रारंभी निघालेल्या ग्रंथदिंडीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. विविध प्रकारची वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी दिंडीच्या मार्गावर साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. ग्रंथदिंडीत सुहासिनी डोक्यावर मंगल कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या. वारकरी आणि झांज पथकही ग्रंथदिंडीत सहभागी झाले होते. ग्रंथदिंडी ग्राम पंचायत कार्यालयाकडे आल्यावर बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, बेळगाव आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, कोण म्हणतंय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही अशा घोषणा देण्यात आल्या.
बेळगावातले ओल्ड मॅन ठरतायत चर्चेचा विषय
बाबूराव मुरकुटे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. स्वागताध्यक्ष विजय नंदीहळळी यांनी स्वागत केले. येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्यावतीने यंदाचा 'राष्ट्रवीर'कार शामराव देसाई साहित्य पुरस्कार धारवाडचे साहित्यिक डॉ. अमृत यार्दी यांना, कै. मारुती पाटील (पेंटर)सामाजिक पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार कॉ. कृष्णा शहापूरकर यांना, रमाबाई आंबेडकर महिला सामाजिक पुरस्कार पुण्याच्या सामाजिक कार्यकर्त्या मेधा सामंत यांना, गुरुवर्य गावडोजी पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार येळ्ळूरच्या शोभा निलजकर यांना, क्रीडा पुरस्कार उमेश मजूकर यांना तर विद्यार्थी क्रीडा पुरस्कार कार्तिक शिवाजी गोरल यांना देऊन गौरविण्यात आले.
शेवटच्या सत्रात प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम झाला. भरत देशपांडे यांनी त्यांची मुलाखत घेतली. प्रारंभी अभिनय ही हौस होती. पण काही काळाने अभिनय हेच माझे करिअर बनले. करिअर सुरू केल्यावर व्यावसायिक नट व्हायला मात्र वेळ लागला. गाजलेल्या मी शिवाजी राजे बोलतो मधील दिनकर भोसलेची व्यक्तिरेखा आजही आपल्या मनात आहे, असे सचिन खेडेकर यांनी सांगितले.
Ajit Pawar | बेळगावप्रश्नी सुप्रीम कोर्टात निष्णात वकील देणार : उपमुख्यमंत्री अजित पवार | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)