एक्स्प्लोर

कलेसाठी बेळगावात कानडी, मराठींनी एकत्र यावं : जितेंद्र जोशी

बेळगावात कन्नड, मराठी न करता सगळ्यांनी एकत्र येऊन कलेसाठी कार्य करावे, असे आवाहन मराठी अभिनेते जितेंद्र जोशी यांनी काढले.

बेळगाव : आम्ही अभिनयाच्या क्षेत्रात आहोत. आम्ही अभिनयाचे काम करतचं असतो. बेळगावात कन्नड, मराठी न करता सगळ्यांनी एकत्र येऊन कलेसाठी कार्य करा, असे उद्गार मराठी अभिनेते जितेंद्र जोशी यांनी काढले. सोसायटी ऑफ आर्टिस्टिक व्हिजन तर्फे चौथ्या आंतरराष्ट्रीय लघू चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी आयनॉक्स चित्रपटगृहात झाले. याप्रसंगी दिग्दर्शक उमेश कुलकर्णी, आयोजक संकेत कुलकर्णी, सचिन भट आणि श्वेत प्रिया उपस्थित होते. बेळगावात आयोजित करण्यात आलेला आंतरराष्ट्रीय लघु चित्रपट महोत्सव अत्यंत महत्वाचा आहे. लघु चित्रपटाची जाणीव वाढवण्यासाठी सगळ्या कलाप्रेमींनी मिळून कार्य करण्याची आवश्यकता आहे. प्रादेशिक अस्मिता, भाषा याविषयी आम्ही नेहमी बोलत असतो आणि जपत असतो. लघु चित्रपट महोत्सव संस्कृतीचीही जाणीव आहे. ही जाणीव वाढवण्यासाठी तुम्हाला एकीने हातात हात मिळवून काम करण्याची गरज आहे. तुम्हीच याचे आधार बनून हात बळकट करावे लागणार असल्याचे जितेंद्रने सांगितले. आंतरराष्ट्रीय लघु चित्रपट महोत्सवाचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे कौतुक करायला पाहिजे. लघु चित्रपट महोत्सव म्हणजे काय असतो? याला किती खर्च येतो, आयोजक सगळे आयोजन कसे करतात याची जाणीव बेळगावकरांना यायला हवी. आयोजक बरेच कष्ट घेऊन महोत्सवाचे आयोजन करतात. त्यांच्या पाठीशी बेळगावकर जनतेने उभारले पाहिजे. म्हणजे या आयोजक तरुणांचा उत्साह अधिक वाढेल, असे मतही जितेंद्र जोशी यांनी व्यक्त केले. रविवारी आंतरराष्ट्रीय लघु चित्रपट महोत्सवाची सांगता होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात 180 लघु चित्रपटातून 58 लघु चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. मराठी, इंग्रजी, हिंदी, जर्मन, स्पॅनिश, श्रीलंकन, कन्नड, इटालियन चित्रपट यावेळी रसिकांना पाहायला मिळणार आहेत. संबंधित बातम्या : CAA Protests | ट्वीटमुळे अभिनेता फरहान अख्तरविरोधात तक्रार पहिल्या गोल्डन ज्युरी फिल्म फेस्टिव्हल दणक्यात पार, विविध सेलिब्रिटींची उपस्थिती सिम्पल लूकमध्ये 'पंगा' घेणार कंगना, पाहा आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक ABNS I शंभराव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाध्यक्षपदी जब्बार पटेल यांची निवड I एबीपी माझा

महत्त्वाच्या बातम्या

Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
Musician Ravi Dey: प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Embed widget