एक्स्प्लोर
रत्नागिरीत साडेनऊ लाख रुपयांचा दारूसाठा जप्त
गोव्यातून चोरमार्गानं महाराष्ट्रात आणला जाणारा साडेनऊ लाख रुपयांचा दारूसाठा आज रत्नागिरी उत्पादन शुल्क विभागानं पकडला आहे.
रत्नागिरी : गोव्यातून चोरमार्गानं महाराष्ट्रात आणला जाणारा साडेनऊ लाख रुपयांचा दारूसाठा आज रत्नागिरी उत्पादन शुल्क विभागानं पकडला आहे. महत्वाचं म्हणजे मागच्या दोन महिन्यात दारु पकडण्याची ही सातवी कारवाई आहे. ज्यात एकूण 1 कोटी रुपयांचा दारुसाठा जप्त झाला आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरच्या आरवली दरम्यान ही कारवाई झाली. याठिकाणाहून जाणारी एक बोलेरो गाडी थांबवून तपासणी करण्यात आली. त्यात कुरिअरच्या पार्सलमध्ये दारुच्या बाटल्या राज्यात आणल्या जात होत्या.
याप्रकरणी गाडीचा चालक आणि क्लिनरला ताब्यात घेण्यात आलं आहे. मात्र, आम्ही फक्त कुरिअर पोहोचवण्याचं काम करत होतो, कुरिअरमधल्या दारुशी आमचा संबंध नाही, असा दावा दोघांनी केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement