![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Donkey Milk: गाढविणीच्या दुधाला मोठी मागणी; चमचाभर दुधासाठी मोजावे लागतात 100 रूपये
गाढविणीच्या दुधाची आपल्याला सवय नसली तरी तिचे दूध चक्क दहा हजार रुपये लिटरने विकले जाऊ लागले आहे. राज्यात अनेक ठिकाणी याचा यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे.
![Donkey Milk: गाढविणीच्या दुधाला मोठी मागणी; चमचाभर दुधासाठी मोजावे लागतात 100 रूपये World Milk Day 2023: Know why donkey milk have Huge demand spoonful milk costs 100 rupees Donkey Milk: गाढविणीच्या दुधाला मोठी मागणी; चमचाभर दुधासाठी मोजावे लागतात 100 रूपये](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/01/5625d4fd14a55417ef0ed887832fe882168560078030689_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Donkey Milk : दूध म्हटलं कि गायीचं, म्हशीचं आणि शेळीच दूध येते. शेकडो वर्षांपासून गायीचं दूध जगात सर्वाधिक वापरलं जात आहे. पण बदलत्या काळानुसार लोक पर्याय शोधत आहेत. आरोग्याच्या कारणांमुळे लोकांना उत्तम दूध प्यावंसं वाटतं. आज आम्ही तुम्हाला जगात सर्वात महाग विकलं जाणाऱ्या गाढविणीच्या दुधाबद्दल सांगणार आहे. गाढविणीच्या दुधाची आपल्याला सवय नसली तरी तिचे दूध चक्क दहा हजार रुपये लिटरने विकले जाऊ लागले आहे. राज्यात अनेक ठिकाणी याचा यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे.
गाढविणीचे दुध शंभर रुपयाला 10 मिली
आपल्याला गाय , म्हैस आणि बकरी यांचे दूध पिण्याची सवय आहे . गाढविणीच्या दुधाची आपल्याला सवय नसली तरी तिचे दूध चक्क दहा हजार रुपये लिटरने विकले जाऊ लागले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग आणि उमरगा शहरात सध्या दहा व्यवसायिक गाढविणीच्या दुधाची घरोघरी जावून विक्री करत आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या नळदुर्ग आणि उमरगा परिसरात गाढविणीचे दुध शंभर रुपयाला 10 मिली या दराने विकले जाते आहे. या दराने गाढवाच्या दुधाचा दर एक लिटरमागे दहा हजार रुपये होतो. हे लोक गाढविणीला सोबत घेऊन गल्लोगल्ली फिरत आहेत.
गाढविणीचे दूध आठ हजार रुपये लिटर
नांदेड जिल्ह्यातील अशा प्रकारचा व्यवसाय करणारे व्यावसायिक सध्या 15 गाढविणींसह नळदुर्ग, उमरगा शहरात दाखल झाले आहेत. आंध्रप्रदेश आणि तेलंगणामध्ये ही उपचार पद्धती रूढ आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यात गाढविणीच्या दुधाला मोठी मागणी आहे. या दोन्ही राज्यात गाढविणीचे दूध आठ हजार रुपये लिटर या भावाने विकले जाते असा दावा केला जातोय. एक गाढविण दररोज पाव लिटर दूध देते. शहरात फिरल्यानंतर कधी एका व्यावसायिकांचे 300 रुपयांचे तर कधी 400 रुपयांचे दूध विकले जाते. नळदुर्ग शहरात गाढविणीचे 4500 रुपये ते पाच हजार रुपयांचे दूध विकले जाते. राज्यात 35 हजार गाढवे आहेत. प्रति दिवस एक गाढविण 250 ते 300 ग्राम दूध देते.
गाढविणीच्या दुधाने रोगप्रतिकारक क्षमता वाढते
गाढविणीच्या दुधामुळे सर्दी , खोकला, कफ , न्यूमोनिया असे आजार होत नाहीत असा समज आहे. लहान मुलांना सर्दी, पडले असे आजार होऊ नये झाल्यास दुरुस्त होण्यासाठी पूर्वीच्या काळी असा इलाज केला जायचा. गाढविणीच्या दुधाचे सेवन केल्याने सायटो कायनिन नावाचा महत्त्वाचा घटक मानवी शरीरात वाढतो ज्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता चांगली होते शिवाय या दुधात ड जीवनसत्व असते ज्याचा फायदा अर्थरायटीस आजारांच्या रुग्णांना होतो, अशी माहिती परभणीच्या पशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालयातील पशुजन्य पदार्थ प्रक्रिया विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ संदीप रिंढे यांनी दिली आहे.
गायी, म्हशींशिवाय प्राण्यांचं दूध सर्वात महाग वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)