एक्स्प्लोर
Advertisement
वैद्यनाथ कारखाना दुर्घटना, मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी सहा लाखांची मदत
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा हा कारखाना आहे. घटनेची माहिती मिळताच पंकजा मुंडे यांनी लातूर येथील रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली.
बीड/लातूर : वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात गरम उसाच्या रसाची टाकी फुटून 4 कामगारांचा मृत्यू झाला असून 5 जणांवर उपचार सुरु आहेत. त्या सर्वांची प्रकृती चिंताजनक आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा हा कारखाना आहे. घटनेची माहिती मिळताच पंकजा मुंडे यांनी लातूर येथील रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली.
मृत कर्मचाऱ्यांच्या कुटूंबीयांना कारखान्यातर्फे तीन लाख, मुख्यमंत्री सहायता निधीतून दोन लाख रुपये आणि कारखान्याच्या अध्यक्षा पंकजा मुंडे यांच्या वतीने वैयक्तिक एक लाख, असे एकूण सहा लाख रुपये आणि जखमींना दीड लाख रुपये मदत देण्याची घोषणा पंकजा मुंडे यांनी केली. मृताच्या कुटुंबातील एका व्यक्तीला कारखान्याच्या सेवेत सामावून घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
या घटनेतील मृतांचा आकडा आता चारवर पोहोचला आहे. सकाळी गौतम घुमरे आणि दुपारी सुनील भंडारे यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर मधुकर पंढरीनाथ आदनाक आणि सुभाष गोपीनाथ कराड यांचा अनुक्रमे रात्री आणि पहाटे मृत्यू झाला होता. जखमींपैकी चार जणांची प्रकृती अद्याप चिंताजनक असून त्यांच्या बचावासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
पाहा व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement