एक्स्प्लोर
सराफ दुकानात हातसफाई करणाऱ्या महिलांची टोळी जेरबंद
नंदिनी उर्फ नंदा प्रकाश चव्हाण (38), रिना यशवंत पवार (27) आणि पूनम काळू पडवळ (29) अशी आरोपी महिलांची नावे आहेत. या महिलांकडे सखोल विचारपूस केली असता त्यांनी दागिने चोरी केल्याची कबुली दिली आहे.
पुणे : पुण्यातील लोणीकाळभोर येथील सराफ दुकानातून सोने चांदीचे दागिने चोरणाऱ्या तीन महिला आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. नंदिनी उर्फ नंदा प्रकाश चव्हाण (38), रिना यशवंत पवार (27) आणि पूनम काळू पडवळ (29) अशी आरोपी महिलांची नावे आहेत. या महिलांकडे सखोल विचारपूस केली असता त्यांनी दागिने चोरी केल्याची कबुली दिली आहे.
लोणीकाळभोर येथील चेतन ज्वेलर्स या दुकानात 11 डिसेंबर 2018 रोजी आरोपी महिलांनी दागिने खरेदीच्या बहाने आले होते. त्यानंतर त्यांनी दुकानदाराची नजर चुकवून दीड लाख रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने चोरून नेले होते. याप्रकरणी दुकान मालक गोपाळ शंकर वर्मा यांनी लोणीकाळभोर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. त्यानुसार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी तपासादरम्यान दुकानातील सीसीटीव्ही तपासले आणि व्हायरल केले. फुटेजमधील वर्णनाच्या महिला कात्रज पुणे परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर कात्रज येथे जाऊन तेथील परिसरात फूटेजमधील महिलांचे फोटो दाखवले असता या महिला त्याच असल्याची खात्री झाली. पोलिसांनी या तीनही महिलांना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी लोणीकाळभोर पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.
या महिलांकडून पुणे शहर आणि जिल्ह्यात अशा प्रकारचे चोरीचे बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. गुन्ह्याचा अधिक तपास लोणीकाळभोर पोलीस करीत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
बातम्या
जळगाव
राजकारण
Advertisement