एक्स्प्लोर
8 जणांनी गँगरेप केला, 8 महिन्यांच्या गर्भवतीची सांगलीत तक्रार
8 नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार आठ महिन्याच्या गर्भवती महिलेने तासगाव पोलिसात दिली आहे.
सांगली: पतीला कारमध्ये डांबून तब्बल 8 नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार आठ महिन्याच्या गर्भवती महिलेने तासगाव पोलिसात दिली आहे. तासगाव तालुक्यातील तुरची फाटा इथं ही घटना घडल्याचं तिने तक्रारीत म्हटलं आहे.
तक्रारदार महिला सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यातील आहे. याप्रकरणी सागर, मुकुंद माने, जावेद खान, विनोद आणि अनोळखी चौघे याविरोधात तासगाव पोलिसांत महिलेने तक्रार दाखल केली आहे.
तासगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला ही सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील आहे. ती पतीसह हॉटेल व्यवसाय करते. त्यांच्या हॉटेलमध्ये कामासाठी एक विवाहित जोडपे हवे होते. त्यासाठी ते शोध घेत होते.
मुकुंद माने याने महिलेच्या पतीला फोन करुन तुरची फाटा येथे एक जोडपे आहे. वीस हजार रुपये अॅडव्हान्स देण्यासाठी घेऊन या, असे सांगून बोलावून घेतले. मंगळवारी सायंकाळी पाच ते सहाच्या सुमारास हे पती पत्नी तुरची फाटा येथील एका चाळीजवळ पैसे घेवून आले. आल्यानंतर मुकुंद याने त्याच्यासोबत असलेल्या सागरला ‘यांना मारा’ असे सांगितल्यानंतर सागरने दोघांनाही प्लॅस्टिकच्या पाईपने मारहाण करण्यास सुरुवात केली.
यानंतर पीडित महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र, दीड तोळ्याची सोनसाखळी तसेच रोख 20 हजार काढून घेतले. यानंतर दुचाकीवरुन आणखी चौघे त्याठिकाणी आले. महिलेच्या पतीला बाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये डांबून ठेवले. महिलेला जबरदस्तीने ओढून तेथीलच एका खोलीमध्ये नेले. यावेळी पीडीतेवर जबरदस्ती करत असताना ‘मी आठ महिन्यांची गर्भवती आहे, मला सोडा’, अशी विनवणी केली. मात्र सर्व आरोपींनी पीडितेवर बलात्कार केला.
यानंतर पतीला त्याठिकाणी आणून, ‘इथून गप निघून जायचे, पोलिसांत जावू नका, तुमचे कोणी ऐकणार नाही, मी इथलाच आहे’, असे सांगून दम दिला, अशी तक्रार महिलेने पोलिसांत केली.
दरम्यान याप्रकरणातील सत्यता आणि अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक उमेश दंडिले करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement