Nagpur News : नागपूर विद्यापीठातील आणखी एक कारनामा समोर; रोखपाल महिलेने केला लाखोंचा अपहार
Nagpur News : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आणखी एक कारनामा समोर आला आहे. यात रोखपाल पदावर कार्यरत असलेल्या महिलेने तब्बल 44 लाख रुपयांचा अपहार केल्याची माहिती समोर आली आहे.
Nagpur News नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात (Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University) आणखी एक कारनामा समोर आला आहे. यात रोखपाल पदावर कार्यरत असलेल्या महिलेने तब्बल 44 लाख रुपयांचा अपहार केल्याची माहिती समोर आली आहे. नागपूर विद्यापीठात कॅश काऊंटरवर रोखपाल म्हणून कार्यरत महिलेने विद्यापीठाच्या सॉफ्टवेअरमध्ये 439 पावत्या अवैध पद्धतीने मॉडीफाय करत अपहार केल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकरणी अंबाझरी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास सध्या करत आहे.
439 पावत्या मॉडीफाय करून लाखोंचा अपहार
मिळालेल्या माहिती नुसार, 2023 मध्ये विद्यापीठाच्या अभियंता विभागात 34 हजार 160 रुपयांची सुरक्षा ठेव रिफंडसाठी जमा केली गेली होती. मात्र, वित्त विभागाच्या तपासणीत तीच पावती 4 हजार 160 रुपयांची होती. त्यामुळे ही पावती मॉडीफाय करून घोटाळा होत असल्याचा प्रकार समोर आले होते. दरम्यान, ही एक पावती समोर आल्यानंतर महिला रोखपालच्या सर्व पावत्या तपासल्या असता, त्यात 439 पावत्या मॉडीफाय करून 44 लक्ष 40 हजार रुपयांचा अपहार केल्याचे प्रकरण समोर आले. त्यामुळे अखेर विद्यापीठाच्या वित्त विभागाचा तक्रारीवरून अंबाझरी पोलीस स्टेशनमध्ये महिला रोखपाल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
बाजार सजमितीचे दोन संचालक अपात्र; सत्तेचा वापर केल्याचा संचालकांचा आरोप
यवतमाळच्या घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अभिषेक ठाकरे आणि आशिष लोणकर या दोघांना सहकारी संस्थेचे जिल्हा निबंधक यांनी अपात्र घोषित केले आहे. आठ महिन्यापूर्वी शेतकऱ्यांची दिशाभूल करून कापसाचा लिलाव बंद पाडला, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. बाजार समितीमध्ये कापसाचा लिलाव सुरू असताना ठाकरे व लोणकर यांनी कापसाला योग्य भाव मिळावा यासाठी लिलाव बंद पाडला. रस्तारोको आंदोलन केले. हे आंदोलन एकाही शेतकऱ्याची तक्रार नसताना निव्वळ स्वार्थासाठी केलं, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. तर बाजार समितीत शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून आवाज उठवल्याने सत्तेचा वापर करून ही मुस्कटदाबी केल्याचा आरोप आशिष लोणकर आणि अभिषेक ठाकरे यांनी केलाय. त्यामुळे आता या प्रकरणी पुढे काय कारवाई केली जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या