(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Wine : 'वाईनला लिकर म्हणत भुई बडवताहेत' म्हणत वाईन उत्पादक संघटनेचा निर्णयाला पाठिंबा, या मागण्याही केल्या...
भाजपकडून (BJP) होणाऱ्या टिकेवर अखिल भारतीय वाईन उत्पादक संघटनेनं (The wine association ) उत्तर दिले.
Wine : राज्यातील सुपरमार्केटमध्ये आता वाईनची विक्री करता येणार आहे. हा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयानंतर भाजपकडून (BJP) होणाऱ्या टिकेवर अखिल भारतीय वाईन उत्पादक संघटनेनं (The wine association ) उत्तर दिले आहे.
अखिल भारतीय वाईन उत्पादक संघटनेने उत्तर दिले, 'काही जण वाईनला लिकर म्हणत साप साप म्हणून भुई बडवण्याचं काम करतायत ते योग्य नाही. पहिले हे प्रॉडक्ट काय आहे, त्याचे मूल्य काय हे समजून घ्यावे. अनेक देशात वाईन कॉस्मेटिक्स बनतात. द्राक्षांसह इतर फळांपासून महाराष्ट्रात वाईन तयार करण्याची आता गरज आहे. रोजगार निर्मिती, पर्यटन, फूड या सर्वच दृष्टीने वाईन हा महत्वाचा घटक असून शेतीला हा उत्तम जोडधंदा आहे. ख्रिश्चन धर्मात तर वाईनला पवित्र मानले आहे. एवढं सगळं असतांना हे पेय तुम्ही निषिद्ध का ठरवतात ? औषधातही अल्कोहोल असतेच ना ?'
सरकारकडे अजून मागण्या काय?
वाईन संघटनेने सरकारकडे काही मागण्या देखील केल्या आहेत. विक्री व्यवस्था अधिक सुलभ करावी, वाईन पिण्याचे वय 25 वरून 21 वर आणावे बऱ्याच देशात ते 18 आहे. तसेच जूने कायदे आता नको. त्याचप्रमाणे परमिट नको, आधार कार्ड बघून त्याला वाईन खरेदी तसेच सेवन करता यावे.' अशा मागण्या वाईन संघटनेने सरकारकडे केल्या. तसेच महाराष्ट्राने जे धोरण स्वीकारले आहे ते इतर राज्यांनाही स्वीकारण्याची गरज आहे. असंही वाईन संघटनेने सांगितले आहे.
वाईन ही दारू नाही
वाईन संघटनेनं पुढे सांगितलं की, 'सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करता येणार हा निर्णय म्हणजे आमच्यासाठी आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे. वाईन ही शेतात तयार होते. त्यांच्या नाशवंत मालाला भाव मिळतो. ग्रामीण विकास, कृषी पर्यटन, रोजगार निर्मितीला चालना देखील आता मिळेल. वाईन ही काही दारू नाहीये. युरोपियन कंट्रीमध्ये वाईन ही रोजचा जेवणाचा एक भाग आहे. 20 वर्षात शासनाने वाईन उत्पादनाला मदत केली पण मार्केटिंगसाठी काही केले नव्हते ते आता झाले. सरकारच्या या निर्णयामुळे वाईन ही सोप्या रित्या ग्राहकांना मिळेल. महिला लिकर शॉपमध्ये जाऊ शकत नव्हत्या त्यांना आता सुपर मार्केटमध्ये वाईन मिळणार आहे. त्यामुळे महिला देखील वाईन खरेदी करू शकणार आहेत.'
महत्त्वाच्या बातम्या:
Wine : राज्यातील सुपरमार्केटमध्ये आता वाईन मिळणार; राज्य सरकारचा निर्णय
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha