एक्स्प्लोर
प्रियकरासाठी महिलेने पतीला लुटलं, दागिने घेऊन बॉयफ्रेण्ड पसार
पुणे : प्रियकरासाठी पतीला लुटलं, पण साडे आठ लाखांचे दागिने घेऊन प्रियकराने पोबारा केल्याची घटना पुण्यात घडली आहे. बुधवारी (24 मे) रोजी ही घटना घडली. या प्रकरणी पतीने विमानतळ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून, महिला आणि तिच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
24 मे रोजी व्यापारी जनार्दन निंबाळकर (वय 45 वर्ष) यांनी पाहिलं तेव्हा त्यांची पत्नी रुपाली निंबाळकर (वय 35 वर्ष)हातात बॅग घेऊन लगबगीने घरातून जात होती. संशय आल्याने जनार्दन यांनी पत्नीचा पाठलाग केला. पण अंधार असल्याने पत्नी कोणाला भेटत आहे, हे त्यांना पाहता आलं नाही. पत्नी जेव्हा घरी परतली तेव्हा जनार्दन निंबाळकर यांनी दोन दिवस पत्नीकडून जाणण्याचा प्रयत्न केला की, ती कोणाला भेटायला गेली होती.
सुरुवातीला रुपाली निंबाळकर काहीही बोलली नाही. पण नंतर तिने मान्य केलं की, "तिचं भारत सरगर नावाच्या व्यक्तीवर प्रेम करत होती. मागील काही महिन्यांपासून ते रिलेशनशिपमध्ये होते." रुपालीने सांगितलं की, "ती आणि भारत एकमेकांना आवडतात आणि दोघांनीच पळून जाण्याचा निर्णय घेतला होता. पळून गेल्यानंतर ते उर्वरित आयुष्य जम्मू-काश्मीरला घालवणार होते. 24 मे रोजी भारत सरगरला भेटण्यासाठी गेले होते आणि 30 तोळ्यांच्या दागिन्यांची बॅग त्याला दिली."
रुपालीने कबूल केलं की, "दोघांना नोकरी मिळेपर्यंत हे दागिने विकून काम चालवायचं असं ठरलं होतं. मात्र दागिने मिळताच भारतने रुपालीशी बोलणं बंद केलं. त्यानंतर तिला समजलं की भारत पैसे घेऊन पळून गेला आहे."
जनार्दन निंबाळकर यांनी रुपाली आणि भारतविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोघांविरोधात भारतीय दंड विधान कलम 406 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आम्ही सध्या त्या तरुणाचा शोध घेत आहोत, असं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणी अद्याप कोणलाही अटक झालेली नाही. पण रुपालीच्या माध्यमातून भारत सरगरबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रिकेट
रायगड
Advertisement