एक्स्प्लोर
पत्नीच्या आत्महत्येनंतर पती दोन दिवस मृतदेहाजवळ बसून...
पत्नीच्या आत्महत्येनंतर धक्का बसलेला पती विनायक तिथेच तिच्या मृतदेहाजवळ सुन्न होऊन बसून राहिला.
उस्मानाबाद : पत्नीच्या आत्महत्येनंतर मानसिक धक्का बसलेला पती तब्बल दोन दिवस तिच्या मृतदेहाजवळच बसून होता. उस्मानाबादमध्ये घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
उस्मानाबादमधील कसबे तडवळे गावात ही घटना घडल्याची माहिती आहे. 25 वर्षांच्या राजश्री विनायक खारगे यांनी शनिवारी दुपारी राहत्या घरी आत्महत्या केली. पत्नीच्या आत्महत्येनंतर धक्का बसलेला पती विनायक तिथेच तिच्या मृतदेहाजवळ सुन्न होऊन बसून राहिला.
दोन दिवसानंतर मृतदेहाला दुर्गंधी सुटल्यामुळे परिसरातील रहिवाशांनी डोकावून पाहिलं, त्यावेळी ही घटना उघडकीस आली. दुर्दैवाने या काळात राजश्री यांच्या मृतदेहाला मुंग्याही लागल्या.
राजश्री आणि विनायक शेतमजुरी करत होते, त्यांना दोन आणि चार वर्षांची दोन मुलंही आहेत. राजश्री यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
राजकारण
भारत
Advertisement