एक्स्प्लोर

शिवस्मारकाला विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्याला हायकोर्टाची समज

मुंबई : अरबी समुद्रात होणाऱ्या शिवस्मारकाविरोधी याचिकाकर्त्याला हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींनी फटकारलं आहे. हैदराबाद आणि तामिळनाडूला पुतळे उभारणं परवडू शकतं, मग महाराष्ट्राला काय कमी आहे? या शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाच्या मूख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर यांनी शिव स्मारकाला विरोध करणा-या याचिकार्त्याला समज दिली. तसंच या याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. शिवस्मारकाविरोधी याचिका दाखल करणाऱ्या याचिकाकर्त्यांना हायकोर्टानं विचारलं की, "तुम्ही कन्याकुमारी इथला पुतळा पाहिलाय का? तुम्ही हुसैन सागर पाहिलंय का? त्यांना जमू शकत तर महाराष्ट्राची आर्थिक परिस्थती नक्कीच चांगली आहे." महाराष्ट्र सरकारच्या अरबी समुद्रातील शिव स्मारकाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला विरोध करणारी जनहित याचिका मोहन भिडे यांनी दाखल केली आहे. व्यवसायानं चार्टर्ड अकाऊंटन्ट असलेले भिडे कपासी या नावाजलेल्या कोचिंग क्लासमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. भिडे यांनी आपल्या याचिकेत म्हटलंय की, "छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांना नितांत आदर आहे. मात्र जनतेनं टॅक्सरुपी भरलेल्या पैश्याची अशाप्रकारे उधळण करणं चुकीचं आहे." राज्य सरकारने घातलेला हा शिवस्मारकाचा घाट आणि जलपूजन म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर केलेली स्टंटबाजी आहे, असही त्यांनी म्हटलंय. राज्यात एकेठिकाणी भीषण दुष्काळ असताना एखाद्या स्मारकावर 3600 कोटी खर्च करणं चुकीच आहे, तसंच स्मारक बनवण्याऐवजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचं संवर्धन करणं गरजेच आहे, असा दावा त्यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात, राज्याच्या 'या' भागात मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात, राज्याच्या 'या' भागात मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget