एक्स्प्लोर

शिवप्रेमींच्या गळ्यातला ताईत असलेल्या संभाजी भिडे गुरुजींची कहाणी

ज्या माणसाच्या अटकेवरुन राज्यात संघर्ष सुरुय, त्या माणसाची कहाणी आहे तरी काय? असा प्रश्न सर्वांच्या मनात येणं स्वाभाविक आहे.

सांगली : ‘शेवटी विजय हा सत्याचाच होत असतो’, असं सांगत भिडे गुरुजी यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हिंसाचाराच्या आरोपानंतर भिडे गुरुजी यांनी माध्यमांशी प्रथमच संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हिंसाचाराची सखोल चौकशी करुन दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली. भिडे गुरुजींना अटक करण्याची मागणी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. अटक न केल्यास पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. मात्र ज्या माणसाच्या अटकेवरुन राज्यात संघर्ष सुरुय, त्या माणसाची कहाणी आहे तरी काय? असा प्रश्न सर्वांच्या मनात येणं स्वाभाविक आहे. कोण आहेत संभाजी भिडे गुरुजी? नाव...  संभाजीराव भिडे ओळख... महाराष्ट्रातल्या लाखो शिवप्रेमींचं श्रद्धास्थान.. कार्य... महाराष्ट्रातल्या तरुणांमध्ये शिवप्रेम रुजवणं आरोप... कोरेगाव भिमामध्ये दंगल घडवल्याचा पण शिवप्रेमींच्या गळ्यातला ताईत असलेला या माणसाची कहाणी आहे तरी काय? 1934 साली जन्म झालेले संभाजी भिडे मूळचे सांगलीचे... साताऱ्यातल्या वारुगड किल्ल्याचे वंशपरंपरागत सबनीस... त्यामुळे जन्मापासूनच शिवछत्रपतींच्या विचारांचे पाईक... सांगलीत भिडे गुरुजींचं वास्तव्य आहे. सांगलीतल्या गावभागात असलेलं हे अत्यंत साधं घर भिडे गुरुजींचंच... पण याच घरातून संभाजी भिडे गुरुजींनी शिवप्रेमी तरुणांची फौज निर्माण केली. पण इतकी साधी राहणी असलेला माणूस हा शिवप्रेमी तरुणांचं श्रद्धास्थान कसा बनला? साधं धोतर... पांढरा ढगळा शर्ट... आणि कायम अनवाणी... भिडे गुरुजींनी अख्खा महाराष्ट्र अनवाणीच पालथा घातला.. आणि त्याचं मुख्य कारण होतं... गडकोट संवर्धन... धरणी ही माता... त्यामुळे त्या धरणीवर जोडे घालणार नाही... ही प्रतिज्ञा... कुठेही पोहोचण्यासाठी सायकल... महामंडळाची बस... किंवा त्यांचे दोन पाय... दुर्गामाता दौड, गडकोट मोहीम यांचे प्रणेतेही भिडे गुरुजीच.... श्री शिवप्रतिष्ठानच्या झेंड्याखाली... कधीकाळी हाताच्या बोटावर मोजण्याइतपत शिवप्रेमी घेऊन सुरु झालेल्या या मोहिमेत आता महाराष्ट्रभरातले हजारो शिवप्रेमी सामील झाले आहेत... भल्या पहाटे 150 सूर्यनमस्कार... 150 जोर आणि 150 दंडबैठका... सर्वांग व्यायम... ही त्यांच्या दिवसाची सुरुवात आहे. संभाजी भिडे यांची आजवर महाराष्ट्रात अनेक व्याख्याने झाली आहेत. त्यांच्या वक्तृत्वामुळे हजारो तरुण त्यांचे अनुयायी झाले. शिवाय धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मास, दुर्गामाता दौड, धारातीर्थ यात्रा आणि शिवराज्यभिषेक दिन यामुळे त्यांच्या फौजेत भर पडत गेली. उच्च विद्या विभूषित भिडे गुरुजी बऱ्याच जणांना माहित नसेल... पण संभाजी भिडे गुरुजी हे उच्च विद्या विभूषित आहेत. अणुविज्ञान शाखेत त्यांनी एमएस्सी तर केलंच आहे... शिवाय त्या विषयात त्यांना सुवर्णपदकही मिळालंय. भिडे गुरुजी अनेक वर्षांपासून संघाचे स्वयंसेवक होते. पण काही वादामुळे भिडे गुरुजींनी 1980 साली संघाचा निरोप घेतला आणि 1984 साली प्रतिसंघ स्थापन श्री शिव प्रतिष्ठानची स्थापना केली. संघाच्या संचलनाला पर्याय म्हणून दुर्गामाता दौड सुरु झाली, ज्याला तरुणांचा उदंड प्रतिसाद मिळाला आणि तिथूनच भिडे गुरुजींची लोकप्रियता शिखरावर पोहोचली. भिडे गुरुजी आणि वाद नुकताच त्यांनी रायगडावर 32 मण इतक्या वजनाच्या सोन्याचं सिंहासन बसवण्याचा संकल्प केला आहे. अर्थात शिवप्रेम रुजवणाऱ्या या माणसाबाबत काही वादही समोर आले. मिरजमध्ये उफाळलेल्या दंगलीमध्ये सक्रीय भाग घेतल्याचा आरोप होता. 2017 मध्ये पुण्यात पालखीमार्गात अडथळा आणल्याचा आरोप, जोधा अकबर सिनेमाला पश्चिम महाराष्ट्रात अडथळा आणल्याचा आरोप असे अनेक आरोप लागले तरी संभाजी भिडे गुरुजींचे हजारो अनुयायी आजही त्यांच्यासोबत आहेत. कोरेगाव-भीमातल्या हिंसाचारामध्ये संभाजी भिडे गुरुजींचं नाव आल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता आहे आणि त्याच निमित्ताने संभाजी भिडे गुरुजी कोण आहेत, हेच जाणून घेण्याचा हा प्रयत्न..

महत्त्वाच्या बातम्या

ऑक्टोबर हीट चा तडाका अधिक, नेमकी का होतेय तापमानात वाढ? राज्यात पावसाची शक्यता आहे का? हवामानाचा अंदाज काय?
ऑक्टोबर हीट चा तडाका अधिक, नेमकी का होतेय तापमानात वाढ? राज्यात पावसाची शक्यता आहे का? हवामानाचा अंदाज काय?
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget