एक्स्प्लोर

ठाणे महापालिकेत महापौर पदावरुन शिवसेनेत अंतर्गत पेच

ठाणे महापालिकेच्या महापौर पदासाठी खुल्या प्रवर्गाचे आरक्षण पडल्यानंतर महापौर पदासाठी आता इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यामुळं महापौर पदावरुन शिवसेनेत अंतर्गत पेच निर्माण झाला आहे.

ठाणे - राज्यात सत्ता स्थापनेवरुन पेच कायम असताना ठाणे महापालिकेतही आता महापौर पदावरुन शिवसेनेत अंतर्गत पेच निर्माण झाला आहे. बुधवारी ठाणे महापालिकेच्या महापौर पदासाठी खुल्या प्रवर्गाचे आरक्षण पडल्यानंतर महापौर पदासाठी आता इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यामुळं महापौरपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे पाहणे औस्त्युक्याचे ठरणार आहे. राष्ट्रवादीमधून शिवसेनेत दाखल होताना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापौर पद देणार या आश्वासनावरच शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे देवराम भोईर यांनी सांगितले आहे. तर संधी मिळाली तर पुन्हा महापौर होण्याची आपल्याला देखील इच्छा असल्याची प्रतिक्रिया विद्यमान महापौर मीनाक्षी शिंदे यांनी व्यक्त केली आहे. महापौर पदाच्या या रेसमध्ये सर्वात आघाडीवर असलेल्या सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी मात्र सूचक प्रतिक्रिया दिली. कोणत्याही पदासाठी पक्षात काम करत नसून पक्ष जो निर्णय घेईल तो अंतिम असतो असे ते म्हणाले. ठाणे महापालिकेच्या महापौर पदासाठी खुल्या प्रवगाचे आरक्षण पडल्यानंतर महापौर पदासाठी अनेक इच्छुकांची नावे पुढे आली आहेत. त्यामुळं महापौर पदाच्या निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले देवराम भोईर अँड फॅमीलीमधील स्वत: देवराम भोईर यांचे नाव चर्चेत आले आहे. त्यांना पक्षात घेतानाच ही कमीटमेन्ट दिली होती. मात्र, आता संजय भोईर यांनी स्थायी समिती दिल्याने देवराम भोईर यांचे नाव या यादीतून बाहेर फेकले गेल्याची माहिती शिवसेनेच्या सुत्रांनी दिली आहे. असे असले तरी देवराम भोईर यांनी मात्र आपला महापौर पदाचा दावा कायम ठेवला आहे. पालकमंत्री यांनी मला दिलेले आश्वासन विसरणार नाही, अशी मला पूर्ण खात्री आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तर दुसरीकडे विद्यमान महापौर मीनाक्षी शिंदे देखील महापौर पदासाठी पुन्हा इच्छुक असल्याने यामध्ये चुरस आणखी वाढली आहे. महापौर पदासाठी ज्यांचे नाव आघाडीवर आहे त्या नरेश म्हस्के यांनी मात्र सर्व चेंडू पक्षश्रेठींकडे टोलवला आहे. पक्षात काम करणे हाच एकमेव उद्देश असून पदाची कोणत्याही प्रकारची अपेक्षा केली नसल्याचे त्यांनी सांगितले. पक्ष जो निर्णय घेईल तो अंतिम असल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित बातम्या :- ठाण्यातील 3527 झाडांच्या कत्तलीला मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती अग्निसुरक्षा प्रमाणपत्र नससेल्या ठाण्यातील 70 रुग्णालयांना टाळे ठोका, उच्च न्यायालयाचे आदेश

महत्त्वाच्या बातम्या

मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
Embed widget