एक्स्प्लोर

Water Distribution : पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्या, नंतरच इतर पाण्याचं वाटप करा; सरकारचे प्रशासनाला निर्देश

Water Distribution Planning : पाणी वाटप करताना पहिल्यांदा पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्या, नंतरच इतर पाण्याचं योग्य ते वाटप करण्यात यावं, असे निर्देश मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत प्रशासनाला दिले आहेत.

Water Distribution Planning : पाणी वाटप (Water Distribution) करताना पहिल्यांदा पिण्याच्या पाण्याला (Drinking Water) प्राधान्य द्या, नंतरच इतर पाण्याचं योग्य ते वाटप करण्यात यावं, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रशासनाला दिले आहेत. आज महाराष्ट्रातील जलाशयांमध्ये 58.77 टक्के पाणीसाठा आहे. तर मागील वर्षी याच दिवशी 55.12 टक्के पाणीसाठा होता. मागील वर्षाच्या तुलनेत आज जरी तीन टक्के पाणीसाठा जास्त असला तरी यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असण्याची शक्यता आहे त्यामुळे दुष्काळाच्या झळा पोहचू शकतात. म्हणून पाण्याचे नियोजन करण्याचे आदेश सरकारने प्रशासनाला दिलेले पाहायला मिळत आहेत. 

सध्या राज्यातल्या जलाशयांमधील पाण्याची काय परिस्थिती आहे?

अमरावती विभाग
आज  61.47% पाणीसाठा असून मागील वर्षी 55.23% या दिवशी पाणीसाठा होता

औरंगाबाद विभाग
72.7 टक्के पाणीसाठा तर मागील वर्षी याच दिवशी 59.45% पाणीसाठा होता

कोकण विभागात
आज 66.12% पाणीसाठा आहे तर मागील वर्षी याच दिवशी 53.95% पाणीसाठा होता

नागपूर विभाग
आज 67.1% पाणीसाठा आहे तर मागील वर्ष 42.79% पाणीसाठा होता

नाशिक विभाग
आज 70.69% पाणीसाठा आहे मागील वर्षी 48.2% पाणीसाठा होता

पुणे विभाग
आज 42.75% पाणीसाठा असून मागील वर्षी याच दिवशी 59.73% पाणीसाठा होता

राज्यात सध्या पाण्यासाठी किती टँकर सुरु आहेत?

सध्या राज्यात 104 गावं आणि 272 वाड्यांना 74 टॅंकरने पाणीपुरवठा होत आहे. कोकण विभागात सर्वाधिक 78 टँकर सुरु आहेत. नाशिक विभागात ४ टँकर, पुणे विभागात 4 टँकर, अमरावती विभागात 8 टँकर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मागच्या दुष्काळामध्ये मराठवाड्याला सर्वाधिक फटका बसलेला होता. मात्र यावर्षी औरंगाबाद विभागात अद्याप एकही टँकर सुरु झालेला नाही.

मंत्रिमंडळ बैठकीतील इतर आदेश कोणते?

राज्यभरात जनावरांचा चारा आणि वैरण उपलब्ध करुन ठेवायला आतापासूनच सुरुवात करावी. जलयुक्त शिवार योजना आणि इतर योजना तात्काळ सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावेळी पावसाचे प्रमाण कमी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील मोठ्या सात धरणांचा गाळ उपसून खोलीकरण करण्याचेही आदेश सरकारने प्रशासनाला दिले आहेत.

देशात सरासरीच्या 96 टक्के पाऊस, भारतीय हवामान विभागाचा अंदाज

यावर्षी देशात सरासरीच्या 96 टक्के पाऊस (Rain) होणार असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने (Indian Meteorological Department) दिली आहे. देशात यंदा सामान्य पाऊस राहणार आहे. आज भारतीय हवामानशास्त्र विभागाने मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर केला आहे. यंदा देशात 870 मिमी पाऊस म्हणजेच सरासरीच्या 96 टक्के पाऊस होणार आहे. तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हा हवामान विभागाचा दीर्घकालीन अंदाज आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या नेटवर्कवर महाराष्ट्र एटीएसची छापेमारी; 102 ठिकाणांवर छापेमारी, मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील 15 संशयित ताब्यात, सोशल मीडियातून संपर्क साधण्याचा प्रयत्न
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या नेटवर्कवर महाराष्ट्र एटीएसची छापेमारी; 102 ठिकाणांवर छापेमारी, मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील 15 संशयित ताब्यात, सोशल मीडियातून संपर्क साधण्याचा प्रयत्न

व्हिडीओ

Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis on Missing Link: मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
Sheikh Hasina: 'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
Vande Mataram: आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
England vs India T20I: विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
Kailas Patil : राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगर 3.0 च्या चर्चांवर रोखठोक प्रतिक्रिया
राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया
Embed widget