एक्स्प्लोर

सरकारं बदलली तर विकासकामांचं काय होतं?

ज्यावेळी सरकार बदलतं त्याचा थेट परिणाम हा, आधीच्या सरकारने घेतलेल्या निर्णयांवर होतो. बऱ्याचवेळा आधीच्या सरकारचा प्रभाव कमी करण्यासाठी हे प्रकल्प रखडवले जातात किंवा त्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न होतो.

मुंबई - राज्यात सध्या नवीन सरकार येण्याची चिन्हं दिसत आहेत. ज्यावेळी सरकार बदलतं त्याचा थेट परिणाम हा, आधीच्या सरकारने घेतलेल्या निर्णयांवर होतो. आधीच्या सरकारचं क्रेडीट कमी करण्यासाठी अनेकवेळा असे प्रकल्प प्रलंबित ठेवले जातात किंवा त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जातो. परिणामी अनेक विकास प्रकल्प रखडले जातात. फडणवीस सरकारच्या काळातही असे अनेक महत्वाचे प्रकल्प सध्या सुरु आहेत. त्यामुळं या प्रकल्पांवर काय परिणाम होऊ शकतो, याचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न. मेट्रो 3 या प्रकल्पाचं काय होणार? मेट्रो 3 या प्रकल्पासाठी साधारण 24 हजार कोटींचा खर्च आहे. यावर खर्च होणारा निधी केंद्र सरकार 10 टक्के, राज्य सरकार 10 टक्के असा विभागला आहे. त्यासोबत JICA या जपानी कंपनीचे 57 टक्के म्हणजेच साधारण 13 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. यासाठी एमएमआरसी(मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन)ही स्वतंत्र कंपनी स्थानप करण्यात आली आहे. यावर मॅनेजिंग डायरेक्टर या पदावर अश्विनी भिडे कार्यरत आहेत. या प्रकल्पाचे टेंडर अवॉर्ड होऊन काम जवळ जवळ 50 टक्के पूर्ण झालं आहे. त्यामुळे निधीच्या कमतरतेमुळे या प्रकल्पावर परिणाम होणार नाही. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे प्रकल्प खर्चात वाढ झाली तर त्यासाठी लागणाऱ्या परवानग्यांमुळे प्रकल्पाची डेडलाईन गाठण्यास विलंब होऊ शकतो. तसेच संबंधित अधिकारी बदलल्यास कामच्या गतीवर परिणाम होऊ शकतो समृद्धी महामार्ग होणार का? सुमारे 50 हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. नागपूर-मुंबईला जोडणारा हा 710 किमीचा महामार्ग मुंबईला विदर्भाशी जोडेल. यास सर्वपक्षीय विरोध झाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे वीरेंद्र जगताप, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी याला विरोध केला. या विरोधाला न जुमानता मुख्यमंत्र्यांनी काम सुरु केले. समुद्धी महामार्गाचे काम ठरवून दिलेल्या वेळेत पूर्ण व्हावे तसेच या प्रकल्पासाठी काढलेल्या कर्जावरील व्याज प्रकल्पाच्या विलंबामुळे वाढू नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागावर नियंत्रण ठेवण्यासाठी वित्त विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आहे. ही समिती दर महिन्याला या कामाचा आढावा घेऊन त्याचा अहवाल मंत्रिमंडळाला सादर करणार आहे. मात्र, आता मंत्रिमंडळ अस्तित्वात नसल्यामुळे याचा थेट परिणाम कामाचा वेग आणि खर्चावर होण्याची शक्यता आहे. 2020 पर्यंत हा महामार्ग पूर्ण करण्याचा प्रयत्न फडणवीस सरकारचा होता. यासाठी 16 पॅकेजेस अवॉर्ड करण्यात आले असून साधारण 90 टक्के जमीनीचं भूसंपादन पूर्ण झाल्याचा शासनाचा दावा आहे. या प्रकल्पात सर्वात मोठा अडथळा शेतकऱ्यांचा विरोध आणि भूसंपादन होतं. मात्र, भूसंपादनाचे क्लिष्ट काम मार्गी लावण्यासाठी एमएमआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांची विशेष नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरही त्यांना मुदत वाढ देण्यात आली. त्यामुळे आता प्रमुख अडथळा दूर झाल्यामुळे अधिकारी बदलल्यास कामाच्या गतीवर फारसा परिणाम होईल, असं चित्र नाही. ‪

महत्त्वाच्या बातम्या

मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
पुण्यातून मंगेश चिवटेंची माघार; अर्ज भरायला गेलल्या उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात ती रणनीती राहील
पुण्यातून मंगेश चिवटेंची माघार; अर्ज भरायला गेलल्या उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात ती रणनीती राहील
पुण्यात मोठी कारवाई, क्रूड ऑइलच्या गुंतवणुकीतून लाखोंच्या कमाईचे आमिष; आरोपीकडून 2 कोटी 74 लाखांची फसवणूक
पुण्यात मोठी कारवाई, क्रूड ऑइलच्या गुंतवणुकीतून लाखोंच्या कमाईचे आमिष; आरोपीकडून 2 कोटी 74 लाखांची फसवणूक

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Devendra Fadnavis: पदावर नसताना पेपर फुटला, मग MPSC अध्यक्षांचा राजीनामा कसा घेणार? तरीही चौकशीसाठी तयार : देवेंद्र फडणवीस
पदावर नसताना पेपर फुटला, मग MPSC अध्यक्षांचा राजीनामा कसा घेणार? तरीही चौकशीसाठी तयार : देवेंद्र फडणवीस

Embed widget