एक्स्प्लोर
ऐन दुष्काळात पाण्यावर डल्ला, बार्शी-कुर्डूवाडीदरम्यान पाईपलाईनमधून पाणी चोरुन दहा एकर ऊस पोसला
दुसरीकडे बार्शीतील नागरिकांनी या प्रकरणी संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. अर्धा इंच पाईपलाईन मधून येणाऱ्या पाण्यासाठी बार्शीकर वर्षाला 2500 रुपये पाणीपट्टी भरतात. तरीही वेळेवर पाणी मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
सोलापूर : एकीकडे दुष्काळाने नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण होत असताना दुसरीकडे याच नागरिकांच्या हक्काचे पाणी पळविण्याचा प्रकार समोर आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात हा प्रकार समोर आला आहे. एकीकडे संपूर्ण सोलापूर दुष्काळामुळे पाणी टंचाईचे चटके सोसत असताना बार्शीत मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केली जात आहे.
बार्शी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उजनी पाईपलाईनच्या कंदर-कुर्डूवाडी ते बार्शी दरम्यान पाण्याची चोरी केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे चोरलेल्या या पाण्यातून चक्क उसाची शेतीदेखील केली जात आहे. खांडवी ते श्रीपतपिंपरी फाटादरम्यान एका शेतकऱ्याची उसाची तब्बल 10 एकर शेती या चोरलेल्या पाण्यावर केली जात आहे. तब्बल 8 वर्षांपासून हा प्रकार सुरु असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.
या शेतकऱ्याने उजनी धरणातून पाईपलाईनमधून गळती लपवत त्या ठिकाणी पाईप जोडून पाणी विहिरीत वळते केले होते. हेच पाणी शेतीसाठी आणि इतर विहिरींमध्ये साठवले जात असल्याचे समोर आले आहे. दुष्काळात देखील हिरवीगार शेती कशी काय? असा प्रश्न सदर शेतकऱ्याला केला असता हा शेतकरी त्याच्याकडे दोन विहिरी असल्याचे सांगत होता.
VIDEO | ऐन दुष्काळात पाण्यावर डल्ला, बार्शी-कुर्डूवाडीदरम्यान पाईपलाईनमधून पाणी चोरी | एबीपी माझा
विशेष म्हणजे परिसरातील इतर सर्व शेतकऱ्यांच्या विहिरींमधील पाणी तळाला गेले असताना आणि एक-दोन तास देखील पाण्याची मोटर चालू शकत नसताना आणि पिके करपत असताना या शेतकऱ्याची शेती बागायती कशी? असा प्रश्न कुणाच्याही मनात आला नाही हे विशेष मानले जात आहे.
दुसरीकडे बार्शीतील नागरिकांनी या प्रकरणी संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. अर्धा इंच पाईपलाईन मधून येणाऱ्या पाण्यासाठी बार्शीकर वर्षाला 2500 रुपये पाणीपट्टी भरतात. तरीही वेळेवर पाणी मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
इतकी वर्ष सुरु असलेल्या चोरीकडे प्रशासनाचे लक्ष कसे गेले नाही? असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे. दरम्यान नागरिकांच्या आरोपानंतर प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. संबंधितावर पाणी चोरी प्रकरणी पोलीस कारवाई केली जाईल, असे जलसंपदा विभागाचे अभियंता अजय होनखांबे यांनी सांगितले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement