एक्स्प्लोर

पाण्यासाठी भटकंती, विहरींनी गाठला तळ, माजी मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच पाणी टंचाईच्या झळा

मार्च महिन्यातच नांदेड जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा लागायला सुरुवात झाली आहे. माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांच्या भोकर मतदारसंघात अनेक गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

Water shortage Nanded :  मार्च महिन्यातच नांदेड (Nanded) जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा लागायला सुरुवात झाली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांच्या भोकर मतदारसंघात अनेक गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पोमानाळा येथील ग्रामस्थांनी उपोषण केल्यानंतर टँकर सुरु करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. अजून तिथे टँकर सुरु झालेले नसताना इतर गावातील पाणी प्रश्न समोर आला आहे.

800 लोकसंख्या असलेल्या जाकापूर गावाला तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. गावातील विहिरींनी तळ गाठलाय. थेंबभर पाणी शेंदण्यासाठी विहिरीच्या पाझरातून पाणी येण्याची तासोनतास वाट पाहावी लागत आहे. जाकापूर तांड्यावरील विहिरीनेही तळ गाठला असून विहिरीतील गढूळ पाणी घेण्यासाठीही गर्दी होत आहे. गेल्या महिनाभरापासून हीच परिस्थिती आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनीही महिनाभरापूर्वी गावात येऊन पाणी टंचाईची खरी परिस्थिती पाहिली होती. गावाने टँकरची रितसर मागणीही केली पण अजून एकही टँकर सुरु करण्यात आले नाही. शेतातील विहिरीत किंवा जिथे शेतात बोअरला पाणी आहे तिथून ग्रामस्थांना पाणी आणावे लागत आहे. पिण्यासाठीही थेंबभर पाणी नसल्याने तात्काळ टँकर सुरु करण्याची मागणी ग्रामस्थानी केलीये. 

राज्यातील बहुतांश भागात तापमानाचा भडका उडाला

राज्यातील बहुतांश भागात तापमानाचा भडका उडाला असल्याचे चित्र बघायला मिळात आहे. परिणामी नागरिकांना होळीपूर्वीच प्रचंड उष्ण व दमट हवामानाला समोर जावं लागत आहे. तर दुसरीकडे राज्यातील काही भागात उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईच्या (Water Crisis) झळा सोसाव्या लागत असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागातील जनतेला पाण्यासाठी दाही दिशा भटकण्याची वेळ आली आहे. वाड्या - वस्तीवरील महिलांना तब्बल दीड ते दोन किलोमीटर पायपीट करून केवळ दोन हंडे पाणी मिळते. शेती पिके पाण्याअभावी वाया जाण्याची शक्यता आहे . शेतीपिकांची लागवड होते मात्र पिके पाण्याअभावी करपून जात आहेत.  बळीराजाच्या हातात काहीच शिल्लक राहत नाही. यंदा तर पिण्याच्या पाण्यासाठी देखील लोकांना भटकंती करावी लागत आहे. दरम्यान, पाणी टंचाईच्या मुद्यावरुन नागरिक आक्रमक होताना दिसत आहेत. आमच्या भागात कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी अनेक ठिकाणचे नागरिक करताना दिसत आहेत.

महत्वाच्या बातम्या:

पाणीटंचाईच्या झळा! नळातून येते फक्त हवा, बुलढाण्यात महिला दिनीच महिलांचा ठिय्या; तर भंडाऱ्यात पुरुष उपसरपंचानं साडी नेसून केलं अभिनव आंदोलन

मी गेल्या 2 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहे
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पक्षाच्या नावावर कोणी दुकानदारी करणार असेल तर त्याचा बंदोबस्त करणार, अजित पवारांचा कार्यकर्त्यांना इशारा
पक्षाच्या नावावर कोणी दुकानदारी करणार असेल तर त्याचा बंदोबस्त करणार, अजित पवारांचा कार्यकर्त्यांना इशारा
वझे- केळकर महाविद्यालयात ध्रुवा संस्कृत महोत्सव उत्साहात संपन्न, 400 हून अधिक स्पर्धकांचा सहभाग
वझे- केळकर महाविद्यालयात ध्रुवा संस्कृत महोत्सव उत्साहात संपन्न, 400 हून अधिक स्पर्धकांचा सहभाग
29 तोळे गहाण ठेऊन घेतले 18 लाख, बँक मॅनेजरनेच परस्पर पळवले; खातेदाराचं पोलीस परिसरातच विषप्राशन
29 तोळे गहाण ठेऊन घेतले 18 लाख, बँक मॅनेजरनेच परस्पर पळवले; खातेदाराचं पोलीस परिसरातच विषप्राशन
Ladki Bahin Yojana : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना या महिन्याचा पगार 5 दिवस अगोदर मिळणार, लाडक्या बहिणींना ऑगस्टचे 1500 रुपये कधी मिळणार?
सरकारी कर्मचाऱ्यांचा ऑगस्टचा पगार 5 दिवस अगोदर होणार , लाडक्या बहिणींना चालू महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Powai Filterpada  : वाहून जाताना तरुण थोडक्यात वाचला, पवईतल्या फिल्टरपाड्यातील धक्कादायक घटना
Mumbai Rain Filterpada Powai : हात सुटला, तरुण वाहून गेला! मुंबईतील धडकी भरवणारा व्हिडीओ
Maharashtra Rains | Raigad ला Red Alert, शाळा बंद; Mumbai-Goa Highway ठप्प, 15 जणांना वाचवले
Chiplun Floods | चिपळूणमध्ये Vashishthi, Shiviya नद्यांना पूर, Parshuram Ghat मध्ये भीषणता
Maharashtra Rains | चिपळूणमध्ये पूरस्थिती, नद्या धोका पातळीवर, प्रशासनाचा इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पक्षाच्या नावावर कोणी दुकानदारी करणार असेल तर त्याचा बंदोबस्त करणार, अजित पवारांचा कार्यकर्त्यांना इशारा
पक्षाच्या नावावर कोणी दुकानदारी करणार असेल तर त्याचा बंदोबस्त करणार, अजित पवारांचा कार्यकर्त्यांना इशारा
वझे- केळकर महाविद्यालयात ध्रुवा संस्कृत महोत्सव उत्साहात संपन्न, 400 हून अधिक स्पर्धकांचा सहभाग
वझे- केळकर महाविद्यालयात ध्रुवा संस्कृत महोत्सव उत्साहात संपन्न, 400 हून अधिक स्पर्धकांचा सहभाग
29 तोळे गहाण ठेऊन घेतले 18 लाख, बँक मॅनेजरनेच परस्पर पळवले; खातेदाराचं पोलीस परिसरातच विषप्राशन
29 तोळे गहाण ठेऊन घेतले 18 लाख, बँक मॅनेजरनेच परस्पर पळवले; खातेदाराचं पोलीस परिसरातच विषप्राशन
Ladki Bahin Yojana : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना या महिन्याचा पगार 5 दिवस अगोदर मिळणार, लाडक्या बहिणींना ऑगस्टचे 1500 रुपये कधी मिळणार?
सरकारी कर्मचाऱ्यांचा ऑगस्टचा पगार 5 दिवस अगोदर होणार , लाडक्या बहिणींना चालू महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार?
मोठी बातमी! सरकारी नोकरदांराना खुशखबर, 5 दिवस आधीच पगार मिळणार; आर्थिक तंगी होऊ नये म्हणून निर्णय
मोठी बातमी! सरकारी नोकरदांराना खुशखबर, 5 दिवस आधीच पगार मिळणार; आर्थिक तंगी होऊ नये म्हणून निर्णय
Ajinkya Rahanes playing XI : अजिंक्य रहाणेने आशिया चषकासाठी प्लेईंग 11 निवडली, जितेश शर्माला वरचं स्थान, चकीत करणारी टीम!
अजिंक्य रहाणेने आशिया चषकासाठी प्लेईंग 11 निवडली, जितेश शर्माला वरचं स्थान, चकीत करणारी टीम!
आधी मटका बुकीवर धाड, पु्न्हा पोलिसांना फोन; मंत्री नितेश राणेंच्या 'रेड'ची जिल्ह्यात चर्चा, सगळ्यांची धावाधाव
आधी मटका बुकीवर धाड, पु्न्हा पोलिसांना फोन; मंत्री नितेश राणेंच्या 'रेड'ची जिल्ह्यात चर्चा, सगळ्यांची धावाधाव
वेळेत तक्रार करुनही कारवाई नाही, तुळजापुरातील 6000 बोगस मतदारांबाबत ओमराजेंचा निवडणूक आयुक्तांना सवाल
वेळेत तक्रार करुनही कारवाई नाही, तुळजापुरातील 6000 बोगस मतदारांबाबत ओमराजेंचा निवडणूक आयुक्तांना सवाल
Embed widget