एक्स्प्लोर
जायकवाडीतून बीड, परभणी, जालन्याला पाणी सोडणार

औरंगाबाद : बीड, परभणी आणि जालना जिल्ह्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. जायकवाडीतून तीन जिल्ह्यांना पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी बैठकीत घेतला आहे. जायकवाडी धरणात सध्या 67 टक्के पाणीसाठा आहे. जायकवाडीतून 2 आणि 3 तारखेला पाणी सोडण्यात येणार आहे. माजलगाव धरणासाठी 4 टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे तर परळी थर्मलसाठी 4 रोटेशनमध्ये 68 दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात येईल. गोदावरी नदीवरील 10 बॅरिकेटमध्ये पाणी सोडण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला मंत्री, आमदार आणि अधिकारी उपस्थित होते.
आणखी वाचा























