(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Washim : वाशिममध्ये ट्रॅव्हल्स आणि टँकरचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, आठ जखमी
Washim : हॉटेल इव्होनटो जवळ खाजगी ट्रॅव्हल्स आणि टँकरमध्ये भीषण अपघात झाला आहे.
Washim : अकोला (Akola) हैद्राबाद (Hyderabad) महामार्गावर वाशिम शहरालगत असलेल्या अकोला नाका परिसरात हॉटेल इव्हेंटोजवळ पुण्यावरून यवतमाळ जाणाऱ्या अदिती ट्रॅव्हल्स आणि मोंटोकारलो कंपनीच्या पाण्याच्या टॅंकरचा आज (7 एप्रिल) सकाळी 7 वाजताच्या सुमारास अपघात झाला आहे. यामध्ये टँकर चालकासह खाजगी बसचा चालका सह 3 जागीच ठार झाले आहेत. तसेच, बसमधील 7 प्रवाशी तर टँकरमधील एकजण असे एकून 8 जण जखमी झाले आहेत. ट्रॅव्हल्स चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. यातील सर्व जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
फत्ते दास बधेल ( टॅंकर चालक , मध्य प्रदेश्) आणि विक्की खंडारे (प्रवासी , पुसद) यांच्या या अपघातात मृत्यू झाला आहे. तर विजय खंडारे, आकाश राठोड, विश्वनाथ मोरे, दिनेश खंदारे,कराचंद पवार, किर्ती माधव जाधव आणि रोशनी राठोड हे सर्व जखमी झालेले लोक पुसद भागातील उस कामगार आहेत . महत्वाची बाब म्हणजे एसटी बसचा संप असल्याने ट्रॅव्हल्स मध्ये क्षमते पेक्षा अधिक प्रवासी असल्याचं कळते. घटनेचा सर्व थरार हॉटेल इव्होनटो च्या cctv केमेऱ्या मध्ये सर्व प्रकार कैद झाला. ट्रॅव्हलच्या सुसाट वेगामुळे हा अपघात झाल्याच कळते
इतर महत्वाच्या बातम्या
- Kirit Somaiya : किरीट सोमय्या आणि नील सोमय्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल, माजी सैनिकांची रात्री उशीरा पोलीस ठाण्यात तक्रार
- Shiv Sena MP Sanjay Raut : संजय राऊतांचं आज मुंबईत 'शक्तीप्रदर्शन'; ढोल-ताशा पथकांसह शिवसैनिक सज्ज
- Mumbai Police : ऑर्केस्टा-डान्स बारमालकांचा मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप, कधी गणवेशातच झोपतात तर नर्तक-गायकांचे फोटो काढतात
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha