एक्स्प्लोर
वाशिममध्ये तलावात बुडून चार लहानग्यांचा मृत्यू

वाशिम : वाशिममधील मंगरुळपीर शहराजवळ चमेली तलावात बुडून चार लहानग्यांचा मृत्यू झाला. यातील दोघेजण सख्खे भाऊ आहेत. बुधवारी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. मंगरुळपीरच्या अशोकनगरमध्ये राहणारी 9 ते 15 वयोगटातील ही मुलं पोहण्यासाठी तलावाकडे गेले होते. दुपारची वेळ असल्याने पोहण्यासाठी ही मुलं पाण्यात उतरली. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने चौघांचाही बुडून मृत्यू झाला आहे. जीवन भगत (वय 10 वर्ष), रोशन भगत (वय 9 वर्ष), रोहन आडाखे (वय 12 वर्ष) आणि आशुतोष बेलखडे (वय 15 वर्ष) अशी मृत चौघांची नावं आहेत. या प्रकारामुळे संपूर्ण शहरात शोककळा पसरली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
आणखी वाचा























