एक्स्प्लोर

सावधान! पुढील 3 ते 4 तास महत्वाचे, वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा, घराबाहेर पडताना खबरदारी घ्या 

हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार पुढचे 3 ते 4 तास महत्वाचे आहेत, कारण, अनेक भागात वादळी वाऱ्याह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

Maharashtra Rain News : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Chnage) होत आहे. अनेक ठिकाणी पावसाला (Rain) सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे. जोरदार पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार पुढचे 3 ते 4 तास महत्वाचे आहेत, कारण, अनेक भागात वादळी वाऱ्याह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

 रत्नागिरी जिल्ह्यात 40 ते 50 किमी वेगानं सोसाट्याच्या वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन ते चार तासात राज्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह 40 ते 50 किमी वेगानं सोसाट्याच्या वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. त्यामुळं घराबाहेर पाडताना नागरिकांनी योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. 

'या' भागात जोरदार पावसाचा इशारा

दरम्यान, रत्नागिरीसह पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या भागात पुढील 3 ते 4 तासात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तसेच गोवा कर्नाटक किनारपट्टी भागातही जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत राज्याच्या अनेक भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. 

पावसाला सुरुवात, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण

दापोलीमध्ये आज सकाळपासून दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे दापोलीत शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. तर मागील दोन चार दिवसापासून सतत पडणाऱ्या पावसामुळे दापोलीतील ग्रामीण भागात शेतीसह पाण्याचा प्रश्न देखील मार्गी लागण्याची शक्यता  निर्माण झाली आहे. पेरणीनंतर शेतकरी देखील शेतीच्या पुढील कामात गुंतला असून पाऊस नियमित झाल्यामुळे दापोलीतील पर्यटनावरती देखील परिणाम झाला आहे. 

मुंबईसह विविध भागात आज पावसाचा यलो अलर्ट

मुंबईसह अनेक भागात पावसाला यलो अलर्ट देण्यात आला आहे. पालघर, रायगड या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय, पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आलाय. तसेच, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर या जिल्ह्यांना आयएमडीने पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसेच विदर्भातील बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिय, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Solapar Rain : पावसामुळे बळीराजा सुखावला! नद्या-बंधारे तुडुंब भरले; जून महिन्याच्या आठवडाभरातच पावसाने सरासरी ओलांडली

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : कोल्हापूर सर्किट बेंचच्या पहिल्याच दिवशी गोकुळविरोधात याचिका, 120 केसेस बोर्डवर
कोल्हापूर सर्किट बेंचच्या पहिल्याच दिवशी गोकुळविरोधात याचिका, 120 केसेस बोर्डवर
अकोल्याच्या राष्ट्रीय महामार्गावर ST बस अन् दुचाकीच्या धडकेत बाईकस्वार ठार, रायगडमध्ये  कशेडी घाटात ट्रक उलटला
अकोल्याच्या राष्ट्रीय महामार्गावर ST बस अन् दुचाकीच्या धडकेत बाईकस्वार ठार, रायगडमध्ये कशेडी घाटात ट्रक उलटला
सराफ व्यवसायिकाकडून अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; तरुणीची पोलिसात धावा, दोघांना अटक
सराफ व्यवसायिकाकडून अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; तरुणीची पोलिसात धावा, दोघांना अटक
पावसाचा जोर उद्याही कायम राहणार; मुंबईसह 4 जिल्ह्यातील शाळा, कॉलेजला सुट्टी जाहीर
पावसाचा जोर उद्याही कायम राहणार; मुंबईसह 4 जिल्ह्यातील शाळा, कॉलेजला सुट्टी जाहीर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

INS Tabar :भारताची पॉवर - आयएनएस तबर;अभिमान वाटावी अशी नौदलाची शक्तिशाली युद्धनौका Independence Day
Sanjay Raut Announcement : मुंबईसह अनेक महापालिका लढणार, संजय राऊतांची मोठी घोषणा
Narendra Modi Big Announcement : 12 वर्ष 12 घोषणा, नरेंद्र मोदींच्या घोषणेचा आढावा
Maharashtra LIVE News : 05.00 AM : Superfast News Update : 15 AUG 2025 : ABP Majha
Operation Sindoor | Wagah Border वर Independence Day चा उत्साह, 1971 च्या विजयाची आठवण!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : कोल्हापूर सर्किट बेंचच्या पहिल्याच दिवशी गोकुळविरोधात याचिका, 120 केसेस बोर्डवर
कोल्हापूर सर्किट बेंचच्या पहिल्याच दिवशी गोकुळविरोधात याचिका, 120 केसेस बोर्डवर
अकोल्याच्या राष्ट्रीय महामार्गावर ST बस अन् दुचाकीच्या धडकेत बाईकस्वार ठार, रायगडमध्ये  कशेडी घाटात ट्रक उलटला
अकोल्याच्या राष्ट्रीय महामार्गावर ST बस अन् दुचाकीच्या धडकेत बाईकस्वार ठार, रायगडमध्ये कशेडी घाटात ट्रक उलटला
सराफ व्यवसायिकाकडून अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; तरुणीची पोलिसात धावा, दोघांना अटक
सराफ व्यवसायिकाकडून अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; तरुणीची पोलिसात धावा, दोघांना अटक
पावसाचा जोर उद्याही कायम राहणार; मुंबईसह 4 जिल्ह्यातील शाळा, कॉलेजला सुट्टी जाहीर
पावसाचा जोर उद्याही कायम राहणार; मुंबईसह 4 जिल्ह्यातील शाळा, कॉलेजला सुट्टी जाहीर
Chhagan Bhujbal : शेतकऱ्यांवरील बंधनं हटवा; शरद पवारांचं कौतुक करत छगन भुजबळांचा महायुती सरकारलाच उपरोधिक सल्ला
शेतकऱ्यांवरील बंधनं हटवा; शरद पवारांचं कौतुक करत छगन भुजबळांचा महायुती सरकारलाच उपरोधिक सल्ला
रशियाच्या व्लादीमीर पुतीन यांचा PM नरेंद्र मोदींना फोन; डोनाल्ड ट्रम्पसोबतच्या भेटीचा दिला वृत्तांत
रशियाच्या व्लादीमीर पुतीन यांचा PM नरेंद्र मोदींना फोन; डोनाल्ड ट्रम्पसोबतच्या भेटीचा दिला वृत्तांत
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2025 | सोमवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2025 | सोमवार
Vidarbha Rain: विदर्भात मुसळधार पावसाचा कहर!धरणांचे दरवाजे उघडले,पूराच्या पाण्यात जनजीवन ठप्प,कुठे काय परिस्थिती?
विदर्भात मुसळधार पावसाचा कहर!धरणांचे दरवाजे उघडले,पूराच्या पाण्यात जनजीवन ठप्प,कुठे काय परिस्थिती?
Embed widget