एक्स्प्लोर

वर्धा पोलिस अॅक्शन मोडवर, गँगवारच्या मुसक्या आवळण्यासाठी 'अँटी गँग सेल'ची निर्मिती 

Wardha News Update : गँगवारच्या मुसक्या आवळण्यासाठी वर्धा पोलिसांनी 'अँटी गँग सेल'ची निर्मिती केली आहे.  

Wardha News Update : वर्ध्या शहरात धुमाकूळ घालणाऱ्या गँगच्या मुसक्या आवळण्यासाठी  आता 'अँटी गॅंग सेल' सुरू करण्यात आला आहे. या 'अँटी गँग सेल'च्या माध्यामातून पोलिस धुमाकूळ घालणाऱ्या गँगवर नजर ठेवणार आहेत. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत गँगवारमधील जवळपास डझनभर आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

वर्ध्यात गेल्या काही दिवसांपासून गँगवार वाढत आहे. शिवाय अंमली पदार्थ आणि बंदुकीचा वापर हे चिंतेचे विषय समोर आहेत. हे आव्हान पेलण्यासाठी पोलिस प्रशासनाने देखील कंबर कसली आहे. गँगला लगाम घालण्यासाठी 'अँटी गँग सेल' निर्माण करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांऱ्यांचा या सेलमध्ये समावेश असणार आहे. 

चार दिवसांपूर्वी एका ठिकाणी हवेत गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली होती. हा थरार प्रत्यक्ष अनुभवणाऱ्यांनी तेथून काढता पाय घेतला. पण चर्चा सुरू झाली वर्ध्यातील गँगवारची. मुंबई, नागपूर सारख्या मोठ्या शहरात ऐकले जाणारे गँगवार सारखे शब्द वर्ध्याच्या नगरीत रोज ऐकायला मिळत आहेत. त्यामुळेच वर्ध्यात निर्माण झालेल्या या 'गँग'च्या मुसक्या आवळण्याचा चंग वर्धा पोलिसांनी बांधलाय.

वर्ध्याच्या स्टेशन परिसरात 28 फेब्रुवारीच्या रात्री गुन्हेगारांच्या दोन गँगमध्ये राडा झाला होता. यावेळी तलवारी आणि कोयत्याने मारामारी झाली. याचवेळी हवेत गोळीबार देखील झाला. आमचीच गँग श्रेष्ठ म्हणत या दोन्ही गँगमध्ये  वाद झाला होता.  

पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपास सुरू केला. दोन्ही गँगच्या 14 जणांना पोलिसांनी विविध ठिकाणावरून ताब्यात घेतले. यात एका गँगमधील सहा तर दुसऱ्या गँगमधील आठ जणांचा समावेश आहे. याबरोबरच दोन बुलेटसह एक पिस्तुल, एक तलवार आणि एक कोयता जप्त करण्यात आला आहे. शिवाय अनेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना सात  दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आदिल शेख, शोएब पठाण, गौरव विरखडे, छोटू उपाध्याय, संजय जयस्वाल अशी एका गटातील गुन्हेगारांची नावं आहेत. राकेश पांडे, राहुल मडावी, विकास पांडे, गणेश पेंदोर, दादू भगत, रितीक तोडसाम, राहुल मडावी आणि समीर दलगरम अशी दुसऱ्या गटातील संशयितांची नावे आहेत. या घटनेत अजिंक्य उर्फ अज्जू बोरकर हा गंभीर जखमी झाला असून त्याला सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

महत्वाच्या बातम्या 

हिरो बनण्याचे स्वप्न भंगले, देवावरचा विश्वास उडाला, तरूणाची मालाडमधील मदर मैरी ग्रोटोवर दगडफेक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget