एक्स्प्लोर

घुबडांच्या संवर्धनासाठी पंधरा वर्षांपासून धडपड करणारा अवलिया

एकीकडे अनेक पक्षी दुर्मिळ होत आहे. त्यातही घुबडासारखे पक्षी तर अंधश्रद्धा, गैरसमजाचे बळी पडतात. अशा स्थितीत चक्रधर भगत यांनी घुबडांना प्रजननासाठी अधिवास उपलब्ध करून संवर्धनासाठी चालविलेली धडपड वाखाणण्या जोगीच आहे.

वर्धा : आजच्या वैज्ञानिक युगात घुबडाविषयी समाजात अनेक अंधश्रद्धा, गैरसमज पाहायला मिळतात. हे जरी खरं असलं तरिही विविध कारणांनी घुबडं दुर्मिळ होत आहे. अशातच घुबडाची पिल्लं जर एखाद्याच्या मांडीवर खेळताना पाहायला मिळाली तर, विश्वास बसणार नाही ना? पण, हे खर आहे. चला पाहूयात मागील पंधरा वर्षांपासून घुबडांच्या संवर्धनासाठी सुरू असलेली धडपड करणाऱ्या अवलियाबाबत... वर्धा येथील समुद्रपूर तालुक्याच्या जोगिनगुंफा येथे राहणारा हा शेतकरी. यांचं नाव आहे चक्रधर भगत. नैसर्गिक आपत्तीमुळं होणार्‍या हानीपासून संरक्षण करण्यासाठी त्यांनी शेतात गोठा बांधला आहे. जवळपास पंधरा वर्षांपूर्वी त्यांनी शेतात बांधलेल्या गोठ्यात घुबडानं पिलांना जन्म दिला. सुरूवातीला माणसांचा वावर पाहून घुबड उडून जायचं. पण नंतर त्यांनी घुबडाला अपाय होऊ नये, त्याला त्रास होऊ नये याकरीता विशेष खबरदारी घेण्यास सुरूवात केली. घुबड अंडी देणार्‍या खोलीत कुणी जावू नये, श्वान तसेच इतर प्राण्यांपासून त्याच्या अंड्यांना धोका निर्माण होऊ नये म्हणून ते स्वतः सुरक्षिततेची काळजी घेतात. गेल्या पंधरा वर्षांपासून भगत मागील पंधरा वर्षांपासून घुबडाला प्रजननासाठी सुरक्षित ठिकाण निर्माण करून देतात. पक्षांचा वावर सुरू होताच भगत पूर्वतयारी करायला घेतात. घराच्या मोकळ्या खिडक्या किंवा माळ्यावर कडबा पसरवून ठेवतात. त्यानंतर त्यांच्या शेतातील घरामध्ये घुबड मादी येऊन अंडी देते. येथेच तिच्या पिल्लांचा जन्म होतो. अंडी दिल्यानंतर जवळपास दोन ते अडीच महिने पिल्लांना उडायला येईपर्यंत हे घुबड येथे मुक्कामी असतं. वर्षातून दोन वेळा घुबड मादी अंडी घालत असून त्यांचा कालावधी निश्चित नसतो. पण, साधारणतः ऑक्टोबर, नोव्हेंबरच्या कालावधीत घुबड मादा अंडीत देतात. पिलं मोठी झाली की नैसर्गिक अधिवासात रवाना होतात. एरवी सात पिल्ले देणाऱ्या मादी घुबडानं यंदा नऊ अंडी दिली आहेत. एकीकडे अनेक पक्षी दुर्मिळ होत आहे. त्यातही घुबडासारखे पक्षी तर अंधश्रद्धा, गैरसमजाचे बळी पडतात. अशा स्थितीत चक्रधर भगत यांनी घुबडांना प्रजननासाठी अधिवास उपलब्ध करून संवर्धनासाठी चालविलेली धडपड वाखाणण्या जोगीच आहे. भगत यांच्याप्रमाणे इतरांनीही पक्ष्यांना सुरक्षित अधिवास दिल्यास पक्षांचं संगोपन होईल, यात शंका नाही.

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! पशुधनाचा मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदत, काय आहेत निकष? कोणत्या जनावरांसाठी किती मदत?
मोठी बातमी! पशुधनाचा मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदत, काय आहेत निकष? कोणत्या जनावरांसाठी किती मदत?
Eknath Shinde : मनोज जरांगे म्हणाले, गद्दारीचा शिक्का पुसणार होतो; एकनाथ शिंदेंचे जरांगेंना एका वाक्यात उत्तर, म्हणाले....
मनोज जरांगे म्हणाले, गद्दारीचा शिक्का पुसणार होतो; एकनाथ शिंदेंचे जरांगेंना एका वाक्यात उत्तर, म्हणाले....
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑगसस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑगसस्ट 2026 | गुरुवार
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
Embed widget