एक्स्प्लोर

पायी वारीसाठी वारकरी संप्रदाय आग्रही, पुनर्विचार करावा म्हणून सरकारला पुन्हा साकडं

यंदाचा आषाढी वारी सोहळा (Ashadhi Wari) एसटीतूनच पाठविण्याच्या निर्णयावर राज्य सरकारने शिक्कामोर्तब केला. पण या निर्णयानंतर वारकरी संप्रदायात असंतोष निर्माण झाला. आता राज्य सरकारने पुनर्विचार करावा यासाठी हे संस्थान आग्रही आहेत.

पिंपरी-चिंचवड : राज्य सरकारने एसटीतून पादुका पंढरपूरला  पाठविण्याचा निर्णय घेतलाय. पण याचा पुनर्विचार करून त्यांनी पायी वारीलाच परवानगी द्यावी. यासाठी दहा संस्थान सरकारला साकडं घालणार आहे. उद्या या दहा संस्था व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे पुढची भूमिका स्पष्ट करणार आहेत. यंदाचा आषाढी वारी सोहळा एसटीतूनच पाठविण्याच्या निर्णयावर राज्य सरकारने शिक्कामोर्तब केला. पण या निर्णयानंतर वारकरी संप्रदायात असंतोष निर्माण झाला. आता राज्य सरकारने पुनर्विचार करावा यासाठी हे संस्थान आग्रही आहेत.

 राज्य सरकारच्या निर्णयानंतर नाराज झालेल्या देहू संस्थानच्या विश्वस्तांनी बैठक घेतली. या बैठकीत नेमकं राज्य सरकारला कसं साकडं घालायचं, त्यांनी पुनर्विचार करावा यासाठी कशी मागणी करायची. याचा निर्णय घेतला जाणार आहे. दहाही संस्था त्यांच्या पातळीवर अशा बैठका पार पाडत आहेत आणि उद्या या दहा संस्था व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे चर्चा करून, त्यांची पुढची भूमिका स्पष्ट करणार आहेत.

कुंभमेळ्यात जे घडलं तसं वारीत घडू नये याची दक्षता घेणं आवश्यक : अजित पवार

अजित पवार म्हणाले, राज्य सरकारने सर्व चर्चा करुन पालखी सोहळ्याबाबत निर्णय घेतला आहे. वर्षानुवर्षे चाललेली परंपरा टिकली पाहिजे. परंतु सध्याच्या कोरोना सावटाचाही विचार केला पाहिजे सर्व अधिकारी, पोलिस अधिकारी यांनी सर्वांशी समन्वय साधत पालखी सोहळ्याबाबत निर्णय घेतला आहे. वाखारीला गेल्यानंतर पुढे होणाऱ्या विधीसाठीही शिथिलता देण्यात आली आहे.  मागील वर्षी जसे निर्बंध होते, तसे आता निर्बंध लावलेले नाहीत.  कुंभमेळ्याबाबत जे घडलं तसं इथे घडू नये याचीही दक्षता घेणं आवश्यक आहे. परंपरा टिकली पाहिजे यासाठी समन्वय साधत पालखी सोहळ्याबाबत निर्णय जाहीर केला आहे. आम्ही वारकरी सांप्रदायाच्या भावनांचा आदर करतो, राज्याचं आरोग्याचं हित याकडेही लक्ष दिलं पाहिजे. तिसऱ्या लाटेची शक्यता असल्यानं काही बाबतीत सर्व विचार करुनच निर्णय घ्यावा लागतो. आताही वारकरी सांप्रदायाच्या भावना तीव्र असतील, तर विभागीय आयुक्तांना सूचना देऊ आणि संबंधित मान्यवरांशी चर्चा करण्यास सांगणार आहे. 

वारकऱ्यांची ही नाराजी पाहता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुन्हा चर्चेची तयारी दर्शवली आहे. विभागीय आयुक्त सौरव राव या दहा संस्थांशी बैठक घेतील असं ही त्यांनी स्पष्ट केलंय. शासनाच्या या निर्णयाचं वारकरी संप्रदायाने स्वागत केलंय.अशीच पायी वारीला परवानगी दिलं तर वारकरी त्यांचे कायमचे ऋणी राहतील.  उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एक पाऊल पुढं टाकलंय. त्यामुळं आता विभागीय आयुक्तांशी या दहा संस्थानांची चर्चा होईल. म्हणूनच अखंड वारकरी संप्रदायाला पुन्हा एकदा पायी वारीची आस लागून राहिली आहे. 

गेल्या वर्षी कोरोनाचे संकट सुरु झाल्याने आषाढी वारी संचारबंदीमध्ये झाली होती. यंदा कोरोनाचे संकट मोठ्या प्रमाणात असताना पालखी सोहळ्याने यंदा पायी सोहळ्यास परवानगी देण्याचा आग्रह धरला आहे. याबाबत सर्व प्रकारचे कडक निर्बंध वारकरी संप्रदाय पाळण्यास तयार असल्याचे संप्रदायाकडून सांगण्यात येत असून काही झाले तरी पायी वारीची परंपरा या वर्षी खंडित होऊ देऊ नका अशी संप्रदायाची मागणी आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदा बसमधून पालखी सोहळे अणावे लागणार असून यंदा फक्त 10 पालख्यांना 20 बस दिल्या जाणार आहेत. भाविकांची संख्या देखील दुप्पट करीत वारकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न प्रशासनानं केला आहे. याशिवाय विसाव्यापाशी होणारे प्रतिकात्मक रिंगण करून दिड किलोमीटर पायी  चालत येण्यास निर्बंध घालून परवानगी दिली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया असा उल्लेख, अमृता फडणवीस म्हणाल्या, काँग्रेसने माफी मागायला पाहिजे
काँग्रेसकडून सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया असा उल्लेख, अमृता फडणवीस म्हणाल्या, काँग्रेसने माफी मागायला पाहिजे

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget