एक्स्प्लोर
Advertisement
नगरपालिका निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान
मुंबई : राज्यात सध्या नगरपालिका निवडणुकांची धामधूम सुरु आहे. पहिल्या दोन टप्प्यातील निवडणुका व्यवस्थित पार पडल्यानंतर आज तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकांसाठी मतदान होणार आहे.
तिसऱ्या टप्प्यात कुठल्या नगरपालिकांसाठी मतदान?
तिसऱ्या टप्प्यातील नगरपालिका निवडणुकांना आज सुरुवात होणार आहे. नांदेड जिल्ह्यातील 9 नगरपालिका आणि 2 नगरपंचायतींसाठी आज मतदान होईल. तर औरंगाबादमध्येही 4 नगरपालिकांसाठी आज मतदान होणार आहे. भंडारा जिल्ह्यात चार नगरपालिका आणि गडचिरोली जिल्ह्यातील दोन नगरपालिकेच्या निवडणुका आज होणार आहेत.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नगरपालिका निवडणुकांमध्ये एकमेकांविरोधात लढत असल्याने नांदेडमधील नगरपालिका निवडणुकीत रंगत येणार आहे. कारण इथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी राष्ट्रवादी काँग्रेस दोन हात करत आहे. त्यात कालच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी अशोक चव्हाणांवर तुफान टीका केली. त्यामुळे नांदेडसह तिसऱ्या टप्प्यातील नगरपालिका निवडणुकीत मतदार कुणाला कौल देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
टेलिव्हिजन
करमणूक
क्राईम
Advertisement