Vinayak Raut on Fram Law : ईडीच्या रडारवरील नारायण राणे भाजपमध्ये गेले मग, ते पवित्र झाले? : विनायक राऊत
Vinayak Raut on Fram Law : जे ईडीच्या रडारवर असणारे नारायण राणे यांच्यासारखे नेते भाजपमध्ये गेले त्यांच्या चौकशीचे काय? का ते पवित्र झाले? असा खोचक सवाल विनायक राऊत यांनी केला आहे.
Vinayak Raut on Fram Law : अखेर शेतकरी आणि विरोधी पक्षांच्या एकजुटीमुळे मोदी यांना काळे कायदे मागे घ्यावे लागले असून हा मोदींचा पराभव नसला तरी त्यांनी यातून लोकहिताच्या निर्णयाचा धडा घ्यावा, असा टोला शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी लगावला आहे. हा निर्णय लवकर झाला असता तर 48 शेतकऱ्यांना प्राण गमवावे लागले नसते, असा टोलाही राऊत यांनी लगावला आहे. याच पद्धतीने देशातील ईडी, सीबीआय यांसारख्या संस्था महाराष्ट्रात आघाडी सरकारला त्रास देण्याचे जे काम करत आहेत, याचाही पुर्नविचार पंतप्रधानांनी करावा, असं सांगत जे ईडीच्या रडारवर असणारे नारायण राणे यांच्यासारखे नेते भाजपमध्ये गेले त्यांच्या चौकशीचे काय? का ते पवित्र झाले? असा खोचक सवाल देखील विनायक राऊत यांनी केला आहे. मात्र आम्ही याबाबत तक्रार केली असून भाजपमध्ये गेलेले आणि ईडीच्या रडारवर असणाऱ्या नेत्यांचीही चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
एसटी कामगारांनी तुटेल एवढे ताणू नये : विनायक राऊत
एकाबाजूला कृषी कायद्याबाबत शेतकऱ्यांच्या बलिदानाबाबत बोलणाऱ्या विनायक राऊत यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येबाबत वेगळा पवित्र घेत एसटी कामगारांनी तुटेल एवढे ताणू नये असा सल्ला दिला. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त असल्या तरी विलीनीकरण हा एकाच मुद्दा पकडून बसण्यापेक्षा राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आणि इतर सवलतीबाबत विचार करावा, असा सल्लाही राऊत यांनी दिला.
राज्यात सध्या 75 हजार कोटीची विजेची थकबाकी : विनायक राऊत
राज्यात सध्या 75 हजार कोटीची विजेची थकबाकी असून काही बंडी मंडळी जाणीवपूर्वक बिले थकवून ठेवत आहेत. नारायण राणे यांच्या प्रहारकडेही 25 लाखांची थकबाकी असल्याचं वाचनात आलं होतं, असं सांगत केंद्र सरकारनं 52 हजार कोटींची जीएसटी रक्कम थकवल्यानं वीज बिलं भारावीच लागतील, असं त्यांनी सांगितलं. ही सर्व वीज थकबाकी गोळा झाल्यास मोफत वीज देण्याबाबत विचार होऊ शकतो, असं सांगत सध्या तरी वीजबिलांची थकबाकी गोळा करावी लागेल, असं सांगत शेतकऱ्यांना कोणतीही सवलत देण्यात येणार नसल्याचे संकेत दिले. याच पद्धतीनं पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होणं, शक्य नसून केंद्रानं पैसे थकविल्यानं केवळ एवढे एकाच उत्पन्नाचं साधन असल्यानं राज्यात कोणतेही कर कमी होणार नसल्याचं सांगत सामान्यांनाही पेट्रेल-डिझेल दारात कपात मिळणार नसल्याचं सांगितलं. शिवसेना नेते रामदास कदम यांना पक्षानं भरपूर दिलं असून आता एका सर्वसामान्य शिवसैनिकाला उमेदवारी दिल्याचा आनंद असल्याचं सांगत सुनील शिंदे यांच्या उमेदवारीचे विनायक राऊत यांनी समर्थन केले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :