स्वातंत्र्यवीर सावरकरांची आज 140वी जयंती, दिल्लीतील महाराष्ट्र सदनात सावरकरांना मानवंदना
Maharashtra Sadan: स्वातंत्र्यावीर विनायक दामोदर सावरकर यांची आज 140वी जयंती आहे. आज दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये त्यांची जयंती साजरी करण्यात आली.
Maharashtra Sadan: स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती पहिल्यांदाच दिल्लीतील महाराष्ट्र सदनमध्ये (Maharashtra Sadan) साजरी करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) उपस्थित होते. यासोबतच शिंदे गटातील सर्व खासदार देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
विनायक दामोदर सावरकर यांची पहिली ओळख म्हणजे स्वातंत्र्यवीर. याशिवाय लेखक, कवी, भाषा आणि लिपीशुद्धीचे प्रणेते आणि समाजसुधारक अशीही त्यांची ओळख आहे. सावरकरांनी 1910 मध्ये फ्रान्सच्या मॉर्सेलिस बेटाजवळ बोटीतून उडी मारली होती. त्यानंतर सावरकरांना ब्रिटिशांनी काळ्या पाण्याची सुनावली. अंदमानात सावरकरांनी शिक्षा कशी भोगली याचं वर्णन 'माझी जन्मठेप' या त्यांच्या आत्मचरित्रात आहे. काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असतानाही त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्ये लिहिली. सावरकरांचं देशप्रेम कडवं होतं. 28 मे 1883 रोजी नाशिक जिल्ह्यातील भगूर या गावी त्यांचा जन्म झाला. मुंबईत 1938 मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांनी दहा हजारांपेक्षा जास्त पानांचं लिखाण मराठी भाषेत आणि दीड हजारांहून जास्त पानांचं लिखाण इंग्रजीमध्ये केलं आहे.
नव्या संसद भवनात सावरकारांना मानवंदना
आज नवी दिल्ली येथे नव्या संसद भवनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. या नव्या संसद भवनाच्या इमारतीच्या उद्घाटनाआधी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
'ही गोष्ट अत्यंत अभिमानास्पद'
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती दिल्लीतील महाराष्ट्र सदनात पहिल्यांदाच साजरी करण्यात आली आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की, 'आज दिल्लीतील महाराष्ट्र सदनात स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती साजरी केली जाणे ही गोष्ट अत्यंत अभिमानास्पद आहे.'
आजच नव्या संसद भवनाचे देखील उद्घाटन करण्यात आलं. मात्र या सोहळ्यावर काही विरोधी पक्षांनी मात्र बहिष्कार टाकला होता. त्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की, 'आजच्या या पवित्रदिनी देशाच्या संसदेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन होत आहे ही प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाची बाब आहे. मात्र काही जणांनी त्या कार्यक्रमावर देखील बहिष्कार टाकून मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.'
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सशस्त्र क्रांतीचा हुंकार पेरणारे आद्य क्रांतिकारक #स्वातंत्र्यवीर #विनायक_दामोदर_सावरकर यांचा १४० वा जयंतीदिन अर्थात #वीर_सावरकर_गौरव_दिन आज दिल्लीतील महाराष्ट्र सदनात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस… pic.twitter.com/WWDuua3kXw
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) May 28, 2023
🕚 11am | 28-05-2023 📍Maharashtra Sadan, New Delhi | स. ११ वा. | २८-०५-२०२३ 📍 महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 28, 2023
🔸Offered our humble tributes to one of the greatest sons of BharatMata #SwatantryaveerSavarkar on His Jayanti today and #SavarkarGauravDin, with CM @mieknathshinde ji,… pic.twitter.com/Fgl1UWhKG2
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Pune news : पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातील स्वातंत्र्यवीर सावरकरांची खोली कशी आहे? पाहा फोटो...