(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lata Mangeshkar : जेव्हा 1983 च्या विश्वविजेत्या टीम इंडियाच्या सत्कारासाठी लतादीदी मदत करतात...
Lata Mangeshkar : स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना क्रिकेटची आवड होती. त्यांनी 1983 मध्ये बीसीसीआयलादेखील मदत केली होती.
Lata Mangeshkar And Cricket : लता मंगेशकर गानसम्राज्ञी असल्या तरी त्यांना इतर विषयांचीही आवड होती. क्रिकेटबद्दल लता मंगेशकर यांना विशेष प्रेम होते. सन 1983 मध्ये भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला होता. भारतीय क्रिकेट जगतासाठी ही मोठी कलाटणी देणारी घटना होती. सध्या जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (BCCI) आपल्या विश्वविजेत्या संघातील खेळाडूंना बक्षीस देण्यासाठीही पैसे नव्हते. अशा वेळी स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर या बीसीसीआयच्या मदतीला धावल्या.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला 1983 च्या विश्वविजेत्या भारतीय संघातील खेळाडूंचा सत्कार करत काही रक्कम बक्षीस म्हणून द्यायची होती. त्यावेळी तिजोरीत खडखडाट असलेल्या बीसीसीआयकडे खेळाडूंना बक्षीस देण्यासाठी पैसे नव्हते. बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष एनकेपी साळवे होते. त्यांनी खेळाडूंना काही रक्कम देण्याचा विचार केला होता.
लता मंगेशकर यांनी केली मदत
तत्कालीन बीसीसीआयचे अध्यक्ष एनकेपी साळवे यांनी लता मंगेशकर यांच्याकडे मदत मागितली. लता मंगेशकर यांनी भारतीय संघाच्या मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यावेळी दिल्ली येथील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये एक संगीताचा कार्यक्रम केला. या कार्यक्रमातून 20 लाख रुपये जमले. या रक्कमेतून भारतीय खेळाडूंना प्रत्येकी एक लाख रुपये देण्यात आले. विशेष म्हणजे लता मंगेशकर यांनी या कार्यक्रमासाठी एक पैसाही मानधन घेतले नव्हते.
लतादीदींचे क्रिकेट प्रेम
लता मंगेशकर यांना क्रिकेटमध्ये आवड होती. भारतीय संघाचे अनेक सामने त्या आवर्जून पाहत असे. सामन्यानंतर आपली प्रतिक्रियाही देत असे. माजी कसोटीपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबत लतादीदींजे जिव्हाळाचे नाते होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Lata Mangeshkar : लतादीदी यांनी व्यक्त केली होती 'ही' खंत, म्हणाल्या...
- Lata Mangeshkar : 20 भाषांमध्ये तब्बल 30 हजारांहून अधिक गाणी, लता मंगेशकरांचा सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रम!