Vijay Wadettiwar: सप्टेंबरमध्ये राज्यातील मुख्य खुर्ची बदलणार, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा दावा
पावसानं दडी मारल्यामुळं अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. त्यामुळं राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
मुंबई: सप्टेंबर महिन्यात राज्यातील मुख्य खुर्ची बदलेल असा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. 15-20 दिवसांत राज्यात काय बदल होईल ते राज्य बघेल. सप्टेंबर महिन्यात मुख्य खुर्ची बदलेल, असे वडेट्टीवार म्हणाले. त्यामुळे आता त्यांचा हा रोख कुणाकडे होता, असा प्रश्न सध्या उपस्थित होऊ लागला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी गुरुवारी मुंबईतील प्रसिद्ध वांद्रे येथील ताज हॉटेलमध्ये सर्व मंत्री आणि काही देशांचे कॉन्सिलेट जनरल यांना जेवणाचा निमंत्रण दिलं होतं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिले मात्र दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित न राहिल्यामुळे राज्यात अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरू झाली विरोधकांनी मात्र अजितदादांच्या अनुपस्थितीवरून सरकारवर टीका करण्याची संधी सोडली नसल्याच पाहायला मिळत आहे. विजय वडे्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले, 15-20 दिवसांत राज्यात काय बदल होईल ते महाराष्ट्र बघेल. बदल होणार आहे पण आमची सत्ता येणार नाही. मात्र सप्टेंबर महिन्यात राज्यातील मुख्य खुर्ची बदलेल.
राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा
पावसानं दडी मारल्यामुळं अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. त्यामुळं राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. राज्यात 22 दिवस झाले पावसाने दडी मारलीय. पीकं संकटात आलीय.मराठवाड्यात धरणात फक्त 35 टक्के पाणी आहे. सरकारला शासनाला कोरडा दुष्काळ घोषीत करावा लागेल असे 11 जिल्हे आहेत. कोरड्या दुष्काळाचे पंचनामे करावे लागेल.सोयाबीनचा शेतकरी वाऱ्यावर सोडलाय. संकटांमुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागत आहेय सरकारने जबाबदारी स्वीकारुन काम करावं. यांचा एक आमदार मंत्रीमंडळात घेतलं नाही म्हणून आत्महत्येची धमकी देतोय सरकारला शेतकऱ्यांची परवा नाही, असे वडेट्टीवार या वेळी म्हणाले.
आमचे मुख्यमंत्री 2024 पर्यंत राहणार
विजय वडेट्टीवारांचा दावा चंद्रशेखर बावनकुळे फेटाळला असून 2024 पर्यंत भाजपचा मुख्यमंत्री असणार असे सांगितले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आमच्या वरिष्ठांनी आधीच स्पष्ट केलं आहे की आमचे मुख्यमंत्री 2024 पर्यंत राहणार आहेत. 2024 च्या निवडणूका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालीच लढल्या जाणार आहेत.
हे ही वाचा :
Vijay Wadettiwar : शरद पवार सोबत आले तरच तुम्ही मुख्यमंत्री, पंतप्रधान मोदींची अजित पवारांना अट; वडेट्टीवारांचा दावा