'राज्यातील गुंडांचे अच्छे दिन, रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले...'; विजय वडेट्टीवारांकडून व्हिडिओ ट्विट
Vijay Wadettiwar : राज्यातील गुंडांचे इतके अच्छे दिन आलेत की, महायुती सरकारच्या काळात ते मंत्रालयात एसीची हवा घेत आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
!['राज्यातील गुंडांचे अच्छे दिन, रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले...'; विजय वडेट्टीवारांकडून व्हिडिओ ट्विट Vijay Wadettiwar criticizes the state government by tweet Achhe din of gangsters in the state, the ministry is open for making reels Maharashtra Marathi News 'राज्यातील गुंडांचे अच्छे दिन, रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले...'; विजय वडेट्टीवारांकडून व्हिडिओ ट्विट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/06/35f13cc88e81aedd03f424ecf4ff4e421707201422326923_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Vijay Wadettiwar : गुंडांना रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले केल्याबद्दल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अभिनंदनास पात्र आहे. राज्यातील गुंडांचे इतके अच्छे दिन आलेत की महायुती सरकारच्या काळात ते मंत्रालयात एसीची हवा घेत आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केली आहे.
विजय वडेट्टीवार यांनी आज एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात निलेश घायवळसह काही जण मंत्रालयात फिरताना व्हिडिओ बनवत आहे. यावरून विजय वडेट्टीवार यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर (Maharashtra Government) जोरदार निशाणा साधला आहे.
विजय वडेट्टीवार एक्सवर म्हणतात,
गुंडांना रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले केल्याबद्दल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अभिनंदनास पात्र आहे. राज्यातील गुंडांचे इतके अच्छे दिन आलेत की महायुती सरकारच्या काळात ते मंत्रालयात AC ची हवा घेत आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून येणारा सामान्य माणूस मंत्रालयाबाहेर दिवसभर रांगेत उभा आहे. पेपरफुटी विरोधात तरुण तरुणी रस्त्यावर आंदोलन उपोषणात आपले आयुष्यातील महत्वाचे दिवस घालवत आहे. नागपुरात आदिवासी बांधव आपल्या मागण्यासाठी अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहे आणि इकडे सरकार गुंडांना रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले करून देत आहे. हीच का ती "मोदी की गॅरंटी"?, असे त्यांनी म्हटले आहे.
गुंडांना रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले केल्याबद्दल मा.मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अभिनंदनास पात्र आहे.
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) February 6, 2024
राज्यातील गुंडांचे इतके अच्छे दिन आलेत की महायुती सरकारच्या काळात ते मंत्रालयात AC ची हवा घेत आहे.
महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून येणारा सामान्य माणूस मंत्रालयाबाहेर… pic.twitter.com/vjih1SkiFW
काय म्हणाले विजय वडेट्टीवार?
दरम्यान, विजय वडेट्टीवार पत्रकार परिषदेत म्हणाले की, दिवसेंदिवस सरकारचे घोटाळे समोरं येत आहे. सरकारने क्लृप्त्या लढवणे आणि घोटाळे करणे असं सुरु केलं आहे. मंत्रालयात गुंड निलेश घायवाळ रील तयार करतो सोबत त्याचे इतर गुंड देखील आहेत. हा कशी काय एवढी हिंमत करतो. मुख्यमंत्र्याना भेटायला जातो हे कस काय शक्य होतंय? गुंडांना सोबत घ्यायची वेळ मुख्यमंत्र्यांना घ्यावी लागते, असे त्यांनी म्हटले आहे. रुग्णवाहिका घोटाळा मी समोर आणला होता. आता अंगणवाडी सेविकांचा विषय मांडत आहे. मर्जीतील कंपनीला यांनी मोबाईल खरेदी करण्यासाठी कंत्राट दिलं आहे. खोट्यावधी रुपयांचे काम आहे. दिल्लीची कंपनी आहे ही. ही कुणाच्या जवळची आहे हे लक्षात घ्यायला हवं. त्या कंपनीला पैसे देण्यापेक्षा अंगणवाडी सेविकांना पैसै का दिले नाहीत. कमीशन आणि वसुली यासाठी त्यांनी हा घोटाळा केल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.
महिलांना साडी देण्याचं टेंडर सरकारने काढलं आहे. साडी घोटाळा सरकार करत आहे. अंत्योदय शिधा पत्रिका धारक महिलांना हे साडी देणार आहेत. सरकार साडी देऊन मत मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. या सरकारला साडीला हात घालणाऱ्यांवर कारवाई करता आली नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.
आणखी वाचा
प्रकाश शेंडगेंकडून नव्या राजकीय पक्षाची घोषणा; बबनराव तायवाडे म्हणाले, "त्यांना शुभेच्छा, पण..."
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)