एक्स्प्लोर

'फसगत करणारं फसवं सरकार, राज्यातील सरकारला मिळाली नवीन ओळख'; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल

Maratha Reservation : सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. यावरूनच आता विरोधकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सरकारवर टीका होत आहे.

मुंबई : मराठा समाजाला 10 टक्के स्वतंत्र आरक्षण (Maratha Reservation) देण्याचा निर्णय सरकारने बोलावलेल्या विशेष अधिवेशनात घेण्यात आला आहे. दरम्यान, यावरूनच आता विरोधकांकडून सरकारवर टीका होतांना पाहायला मिळत आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी देखील सरकारवर टीका करतांना, 'फसगत करणारं फसवं सरकार अशी राज्यातील सरकारला मिळाली नवीन ओळख' असल्याचं म्हटले आहे. वडेट्टीवार यांनी ट्वीट करत सरकारवर निशाणा साधला आहे. 

वडेट्टीवार यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, "निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मतं मिळविण्यासाठी फसव्या सरकारकडून मराठा समाजाची पुन्हा फसवणूक. महायुती सरकारने विशेष अधिवेशनाचा फार्स करून आज मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात दिलेले 10 टक्के आरक्षण न्यायालयात टिकणारे नाही. सरकारचे पितळ उघडे पडेल म्हणून आज सभागृहात सरकारने विरोधी पक्षाच्या नेत्यांना बोलू दिले नाही. सरकारने कितीही ढोल वाजवले, उर बडवले तरी आंदोलनकर्त्यांमध्ये सरकारने फसवल्याची भावना आहे. हे या सरकारचे अपयश आहे. महायुतीचे सरकार हे फसवे सरकार आहे. हे मराठा समाजाच्या आता लक्षात आले असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसल्याचा प्रकार 

पुढे बोलतांना वडेट्टीवार म्हणाले की, "दोन वेळा न्यायालयात न टिकलेले आरक्षण पुन्हा या महायुती सरकारने दिले आहे. केवळ लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन केलेला फार्स म्हणजे मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसल्याचा प्रकार आहे. तेलही नाही आणि तुपही नाही आमच्या मराठा समाज बांधवांच्या हाती या महायुती सरकारने फक्त धुपाटणे दिले आहे. निवडणुकीच्या तोंडावर केवळ मतं मिळवण्यासाठी सरकारने ही नौटंकी केली असल्याचे वडेट्टीवार म्हणाले आहेत. 

'फसगत करणारं फसवं सरकार, राज्यातील सरकारला मिळाली नवीन ओळख'

पुढे बोलतांना वडेट्टीवार म्हणाले की, "ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी काँग्रेस पक्षाची आणि माझी भूमीका मी वेळोवेळी मांडली आहे. आता  दिलेले 10 टक्के आरक्षण कोणत्याही आधाराशिवाय दिले आहे. त्यामुळे हे आरक्षण न्यायालयात टिकणार नाही. या महायुती सरकारमुळे मराठा समाजाचा पुन्हा भ्रमनिरास होणार आहे. महायुतीचे सरकार बळीराजाची फसगत करणारं फसवं सरकार आहे. बेरोजगार युवक-युवतींची फसगत करणारं फसवं सरकार आहे. परीक्षार्थी उमेदवारांची फसगत करणारं फसवं सरकार आहे. जुमलेबाजी करणारं जुमलेबाज सरकार आहे. मलिदा खाणारं फसवं सरकार आहे. गॅरेंटीच्या नावाखाली फसगत करणार नो गॅरेंटी सरकार आहे. आता आरक्षण प्रश्नी फसगत करणारं फसवं सरकार म्हणून नवी ओळख या सरकारला मिळाली असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Maratha Reservation: राज्यात आता ७२ टक्के आरक्षण , पाहा कोणाला किती टक्के आरक्षण मिळणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bapu Andhale Case : वाल्मिक कराडचा आणखी एक कारनामा समोर! महादेव गित्तेंवर हल्ला करण्यात हात, बापू आंधळे प्रकरणातील 'तो' व्हिडिओ जितेंद्र आव्हाडांकडून शेअर
वाल्मिक कराडचा आणखी एक कारनामा समोर! महादेव गित्तेंवर हल्ला करण्यात हात, बापू आंधळे प्रकरणातील 'तो' व्हिडिओ जितेंद्र आव्हाडांकडून शेअर
Budget 2025 : गुड न्यूज, 10 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होणार?  अर्थसंकल्पात मोठा निर्णय होण्याची शक्यता
पगारदारांना दिलासा मिळणार? 10 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होण्याची शक्यता, अर्थसंकल्पात निर्णय होणार?
Horoscope Today 24 January 2025 : आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 24 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सTOP 70 At 7AM 24 January 2025 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्याSpecial Report  Saif Attacker : सैफचा सीसीटीव्हीतील आणि अटकेतील हल्लेखोर एक नाही?ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 24 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bapu Andhale Case : वाल्मिक कराडचा आणखी एक कारनामा समोर! महादेव गित्तेंवर हल्ला करण्यात हात, बापू आंधळे प्रकरणातील 'तो' व्हिडिओ जितेंद्र आव्हाडांकडून शेअर
वाल्मिक कराडचा आणखी एक कारनामा समोर! महादेव गित्तेंवर हल्ला करण्यात हात, बापू आंधळे प्रकरणातील 'तो' व्हिडिओ जितेंद्र आव्हाडांकडून शेअर
Budget 2025 : गुड न्यूज, 10 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होणार?  अर्थसंकल्पात मोठा निर्णय होण्याची शक्यता
पगारदारांना दिलासा मिळणार? 10 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होण्याची शक्यता, अर्थसंकल्पात निर्णय होणार?
Horoscope Today 24 January 2025 : आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
Maharashtra Cyber : महाराष्ट्र सायबरची दमदार कामगिरी, गुन्हेगारांना दणका, सर्वसामान्यांचे 119 कोटी रुपये वाचवले
महाराष्ट्र सायबरची दमदार कामगिरी, गुन्हेगारांना दणका, सर्वसामान्यांचे 119 कोटी रुपये वाचवले
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
Embed widget