एक्स्प्लोर

Vidhan Parishad Election : मविआला चार तर महायुतीला सहा अतिरिक्त मतांची गरज, जुळवाजुळव कशी करणार? कुणाचे आमदार फुटणार? 

Vidhan Parishad Election : महाविकास आघाडीला आपला तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी चार किंवा जास्त मतांची गरज पडू शकते. तर महायुतीला आपला नववा उमेदवार निवडून आणण्यासाठी सहा मतांची गरज लागणार आहे. 

मुंबई: विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी  12 जुलैला होणाऱ्या निवडणुकीसाठी (MLC Election 2024) 12 उमेदवार रिंगणात असणार आहेत. महाविकास आघाडीकडून तीन उमेदवार दिल्याने आता ही निवडणूक होणे  अटळ आहे. विधानपरिषदेच्या या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात उतरल्याने महाविकास आघाडी असू देत किंवा मग महायुती दोन्हीकडून मतांची जुळवा जुळवा करून आपल्या उमेदवारांना निवडून आणण्याचे एक मोठा आव्हान वरिष्ठ नेत्यांसमोर असणार आहे. मतांची जुळवाजवळ नेमकी कशी केली जाणार? कोणाला किती मतं  मिळणार? अपक्ष आमदारांचा नेमका रोल किती आहे? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. 

विधानपरिषदेची 12 जुलैला होणारी निवडणूक बिनविरोध होईल अशी स्थिती होती. मात्र शेवटच्या दोन दिवसांमध्ये महाविकास आघाडीने तिसरा उमेदवार दिला आणि या निवडणुकीची चुरस आता आणखी वाढली आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या प्रज्ञा सातव, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शेकापचे  जयंत पाटील आणि वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली ते शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांची. त्यामुळे आता महाविकास आघाडीला आपला तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे.

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी  23 मतांचा कोटा असेल. विधानसभेत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये कोणाची किती ताकद असेल आणि अकरावी जागा निवडून आणण्यासाठी मतांची जुळवाजुळव कशी करावी लागणार याची आकडेवारी जाणून घेऊयात, 

महाविकास आघाडी

राष्ट्रवादी शरद पवार - 12

उद्धव ठाकरे शिवसेना - 15 + 1 शंकरराव गडाख = 16

काँग्रेस - 37

एकूण - 65

महाविकास आघाडीला मतांची जुळवाजुळव करण्यासाठी चार किंवा त्यापेक्षा अधिक मतांची गरज पडेल.  

छोटे घटक पक्ष

1) बहुजन विकास आघाडी - 3

2) समाजवादी पक्ष - 2

3) एमआयएम - 2 

4) मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी - 1

5) शेतकरी कामगार पक्ष - 1

एकूण - 9

महाविकास आघाडी एकूण आमदार - 65

महाविकास आघाडीला पाठिंबा देऊ शकणारे पक्ष

1) समाजवादी 2

2) एमआयएम 2

3) मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी 1

4) शेतकरी कामगार पक्ष 1 

महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे पक्ष लक्षात घेऊन एकूण आमदार - 71 आमदार

महायुती आमदारांची संख्या

राष्ट्रवादी (अजित पवार) 41

भाजपा - 103

शिवसेना - 38

महायुती पाठींबा देणारे आमदार

राष्ट्रवादी (अजित पवार)

1) देवेंद्र भुयार 

2) संजयमामा शिंदे 

राष्ट्रवादी + अपक्ष - 43

भाजपला पाठिंबा देणारे आमदार 

1) रवी राणा 

2) महेश बालदी 

3) विनोद अग्रवाल 

4) प्रकाश आवाडे 

5) राजेंद्र राऊत 

6) विनय कोरे 

7) रत्नाकर गुट्टे 

भाजप + मिञ पक्ष आणि अपक्ष- 103+ 7 = 110

एकनाथ शिंदे शिवसेना- 38

पाठिंबा देणारे आमदार - 10

1) नरेंद्र भोंडेकर 

2) किशोर जोरगेवार 

3) लता सोनवणे 

4) बच्चू कडू 

5) राजकुमार पटेल 

6) गीता जैन 

7) आशीष जैसवाल 

8) मंजुळा गावीत 

9) चंद्रकांत निंबा पाटील 

10) राजू पाटील 

एकूण - शिवसेना + मिञ पक्ष आणि अपक्ष = 38+ 10 = 48

महायुती एकूण आमदार - 201

महायुतीला आपले नऊ उमेदवार निवडून आणण्यासाठी आणखी सहा मतांची गरज पडणार आहे. त्यामुळे अपक्ष आमदारांवर महायुती या सगळ्यासाठी अवलंबून असेल. 

आता  विधान परिषदेच्या 11 उमेदवार निवडून येताना  एक उमेदवार महायुतीचा पडणार की महाविकास आघाडीचा हे 12 जुलैला कळणार आहे. त्यामुळे आपण दिलेल्या सर्व उमेदवार निवडून यावेत यासाठी अपक्ष उमेदवारांवर  महाविकास आघाडी आणि महायुती अवलंबून असेलच. शिवाय क्रॉस वोटिंगवरसुद्धा विशेष लक्ष या निवडणुकीत असेल. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार हे नक्की. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli : जगजेत्त्या किंग कोहलीचं अलिबागमधील आलिशान घर, 13 कोटींच्या बंगल्याचे फोटो पाहिले का?
जगजेत्त्या किंग कोहलीचं अलिबागमधील आलिशान घर, 13 कोटींच्या बंगल्याचे फोटो पाहिले का?
Disha Patani : दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Shantata Rally | जरांगेंचा शांतता रॅलीतून मराठवाडा दौरा, 13 जुलैला मोठा निर्णय घेणारCNG Bike Launch : बजाज फ्रिडम 125 लवकरच बाजारात, सीएनजीची बाईकचा लूक पाहिलात का?ABP Majha Headlines : 11 PM : 05 Jully : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सAnant Ambani& Radhika Merchant wedding | अनंत-राधिका मर्चेंटच्या संगीत सोहळ्याला दिग्गजांची उपस्थिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli : जगजेत्त्या किंग कोहलीचं अलिबागमधील आलिशान घर, 13 कोटींच्या बंगल्याचे फोटो पाहिले का?
जगजेत्त्या किंग कोहलीचं अलिबागमधील आलिशान घर, 13 कोटींच्या बंगल्याचे फोटो पाहिले का?
Disha Patani : दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
Embed widget