Vidarbha Rain alert : पूर्व विदर्भात पावसाचे थैमान!हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा,'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
Maharashtra Rain : हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार नागपूरसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना दमदार पावसाने अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक भागात जलमयस्थिती निर्माण झालीय.
Vidarbha Weather Update : हवामान विभागाने वर्तविलेल्या (IMD) अंदाजानुसार नागपूरसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना दमदार पावसाने (Heavy Rain) अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक भागात जलमयस्थिती निर्माण झालीय. तर, अनेकांच्या शेतातील हातातोंडाशी आलेला भात पीक आणि इतर पिके जमीनदोस्त झाल्याचे चित्र आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका पूर्व विदर्भातील भंडार, गोंदिया, चंद्रपुर, गडचिरोलीसह आसपासच्या गावांना बसला आहे. तर आज देखील हा पावसाचा जोर कायम राहणार असून आज विदर्भात नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट नागपूर वेध शाळेने वर्तवला आहे. संभाव्य पावसाचा अंदाज लक्षात घेता योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.
गोंदिया जिल्ह्यात पावसाची दाणादाण, अनेकांच्या घरात शिरले पाणी
गोंदिया जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. गोंदियातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आलीय, यातच गोंदिया शहरातील रिंग रोड आणि कुडवा या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आल्याने या परिसरातील अनेक लोकांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांची रात्रीपासूनच तारांबळ उडाली आहे. अनेक ठिकाणी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळात सुद्धा पाणी आल्याने यांच्या मूर्तीच्या समोर पाणी साचलेले आहे. गोंदिया अनेक भागांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे.
शहरातील मुख्यरस्त्यांवर चक्क बोटी चालू लागल्या
अशीच काहीशी परिस्थिती गडचिरोली जिल्ह्याची आहे. जिल्ह्यात सध्या पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून भामरागड येथील पुरामुळे बोटीने रुग्णांना रुग्णालयात आणण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात पाऊसाने सध्या काहीशी विश्रांती घेतली असली तरी भामरागड शहरात आलेला पूर जैसे थे स्थितीत आहे. दरम्यान भामरागडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांना स्थानिक पोलीस,आपत्ती व्यवस्थापनाच्या कर्मचाऱ्यांनी बोटीच्या साह्याने दोन रुग्ण वृद्धांना वेगवेगळ्या ठिकाणावरून सुरक्षित आरोग्य केंद्रात आणण्यात आले आहे. शहरात चक्क बोटी चालू लागले आहेत.
छत्तीसगड राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे पार्लकोटा नदीला पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्याचा फटका भामरागड शहराला बसला आहे. शहरातील अनेक दुकाने घरे अजून ही पाण्याखाली आहेत. शहरातील आंबेडकर नगर, शोभा नगर, आयटीआय रोड, भागात पाणी शिरलं आहे दुसरीकडे सिरोंचा तालुक्यातील इंद्रावती नदी काठेवर असलेल्या करजेली गावाला देखली पुराचा फटका बसला आहे. यात 28 जणांना सुरक्षित स्थळी काल हलवण्यात आले आहे.
भंडारा - मध्यप्रदेश आंतरराज्यीय महामार्ग जलमय
भंडारा जिल्ह्याला मध्यरात्रीच्या सुमारास पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय. यामुळे भंडारा शहरासह ग्रामीण भागाच्याही अनेक भागात जलमय स्थिती निर्माण झालीय. दरम्यान, भंडारा-मध्यप्रदेश या दोन राज्यांना जोडणाऱ्या तुमसर शहरातून जाणाऱ्या आंतरराज्य मार्ग हा मुसळधार पावसानं जलमय झाला आहे. तर खड्डेमय रस्त्यातून मार्गक्रमण करताना वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागत असल्याचं चित्र बघायला मिळत आहे.
हे ही वाचा