Heavy Rain : पुराच्या पाण्यात अडकले नागरिकांच्या सुटकेचा थरार, अनेक गावांचा संपर्क तुटला; विदर्भात पावसाचं थैमान
Vidarbha Rain Update : विदर्भात (Vidarbha) आज सकाळपासून मुसळधार पाऊस (Rain) सुरु असून पूर्व विदर्भातील (Vidarbha Rain Update) जवळ जवळ सर्व जिल्ह्यांना मुसळधार पावसाने अक्षरक्ष: धो-धो धुतलंय .
Vidarbha Rain Update : विदर्भात (Vidarbha) आज सकाळपासून मुसळधार पाऊस (Rain) सुरु असून पूर्व विदर्भातील (Vidarbha Rain Update) जवळ जवळ सर्व जिल्ह्यांना मुसळधार पावसाने (Heavy Rain) अक्षरक्ष: धो-धो धुतलंय . यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र असून जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. तसेच आज देखील विदर्भात आज जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. चंद्रपूरला (Chandrapur) आज रेड अलर्ट (Red Alert) देण्यात आलेला आहे. तर नागपूर (Nagpur), गडचिरोली (Gadchiroli), वर्धा (Wardha), अमरावती (Amaravati) या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे. दरम्यान,राज्याची उपराजधानी नागपूरसह पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपुर, गडचिरोली इत्यादि भागात सर्वत्र पावसानं एकच थैमान घातल्याचे बघायला मिळाले आहे. यात अनेक गावांचा मार्ग बंद पडल्याने वाहतून व्यवस्था ठप्प पडली आहे. अशातच गोंदिया जिल्ह्यात पुराच्या पाण्यात अडकले काही नागरिकांचा सुटकेचा थरार अनुभवायला मिळाला आहे.
पुराच्या पाण्यात अडकले नागरिकांच्या सुटकेचा थरार
गोंदिया जिल्ह्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अशातच गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील पिपरी येथील चुलबंद नदी दुथडी भरून वाहत आहे. दरम्यान पिपरी येथील शेतकरी रवींद्र पुंडे आणि त्यांचा मुलगा अजय पुंडे हे दोघेही बापलेक सकाळच्या सुमारास शेतात गेले होते. दरम्यान अचानक पावसाने शेताला वेढा घातला अजून ते दोघेही बापलेक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. त्यांनी एका झाडाचा सहारा घेतला असून फोनवरून याची माहिती गावकऱ्यांना दिली. घटनास्थळी बचाव पथक पोहोचले असून सध्या त्याच्या बचावाचे मदत कार्य सुरू आहे. तर अशीच एक घटना गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील खडकी येथे घडली.
रात्रभर बरसलेल्या मुसळधार पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी, देवरी, मोरगाव अर्जुनी या तिन्ही तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशातच सकाळच्या सुमारास शेतात गेलेले दोन तरुण शेतकरी दल्ली नाल्याच्या पुरात अडकले होते. त्यांना बचाव पथकाच्या वतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील खडकी येथील हे दोघे शेतकरी आहेत. निमराज शिवणकर आणि रामू पंधराम असे पुरातून बाहेर काढलेल्या शेतकऱ्यांची नाव आहेत.
भंडारा जिल्ह्यात 20 ग्रामीण भागातील जिल्हा अंतर्गत अनेक मार्ग बंद
भंडारा जिल्ह्याला हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला होता. त्यानुसार जिल्ह्यातील विविध रस्त्यांवरून पुराचे पाणी ओसंडून वाहत आहे. आणि वाहतुकीसाठी जिल्ह्यातील 20 रस्ते बंद झालेले आहेत. त्यामध्ये भंडारा तालुक्यातील भंडारा ते कारधा साई मंदिर, खातरोड मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. लाखनी तालुक्यातील पालांदूर ते तई मार्ग, लाखनी ते अड्याळ, कोंढा ते बेलाटी रोड, डोंगरगाव ते बोलेवाडी, कोंढा ते सोमनाळा, विरली ते सोमनाळा, पालांदूर ते गोंदीदेवरी बंद आहेत.
दरम्यान, साकोली तालुक्यातील मरेगाव ते सोमनाडा, मरेगाव ते मस्तीटोला हे मार्ग बंद आहेत. पवनी तालुक्यातील आडगाव ते ढोलसर, धामणी ते पालोरा, उमरी ते ईसापुर, मांगली ते पोवना, मेंढाळा ते मोथाळा तर लाखांदूर तालुक्यातील लाखांदूर ते पिंपळगाव (को.), कान्हळगाव ते पुयार, विरली ते ढोलसर, चिचगाव ते रुयाळ, परसोडी ते अडेगाव ते गौरा, मांडळ ते पुढेगाव वाहतुकीसाठी बंद झालेले पाहायला मिळत आहेत सातत्यानं पाऊस पडत असल्यानं गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून टप्प्याटप्प्यानं पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्यानं नदी काठावरील नागरिकांनी सतर्क राहावे आणि काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडले, 1 लाख 77 हजार 353 पाण्याचा विसर्ग
Anchor : भंडारा जिल्ह्यासह गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोसीखुर्द धरणाच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झालेली आहे. यामुळं गोसीखुर्द धरण प्रशासनानं धरणाचा जलसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाचे सर्वच्या सर्व 33 दरवाजे उघडले आहेत. 13 गेट एक मीटरने तर 20 गेट अर्धा मीटरने उघडली आहेत. या 33 गेटमधून 1 लाख 77 हजार 353 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पाऊस सातत्याने पडत राहिल्यास आणखी पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना धरण प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या