Nagpur News : काही तासांच्या पावसाने उपराजधानीची दाणादाण; 10 हजार घरांमधील संसाराचे नुकसान, स्मार्ट सिटीचा लौकिक धुळीला मिळाला
Nagpur News : सध्या नागपुरात (Nagpur News) पावसाने विश्रांती घेतली असली तरी अजूनही सकल भागात पाणी साचून आहे. अशातच आता स्मार्ट सिटीतील घनकचरा व्यवस्थापनाच्या अद्यावत यंत्रणेचीही पोलखोल झाली आहे.
Nagpur News नागपूर : उपराजधानी नागपूरसह (Nagpur News) विदर्भातील (Vidarbha) बहुतांश जिल्ह्यांना शनिवार, रविवारी धुव्वाधार पावसाने (Heavy Rain) धो- धो धुतलंय. दरम्यान अजून देखील काही भागात पावसाचा जोर कायम असून संभाव्य पावसाचा धोका लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन स्थानिक प्रशासन आणि हवामान विभागाच्या (IMD)) वतीने केले आहे. शनिवारी सकाळी सहा तासात एकट्या नागपूरमध्ये 217.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती.
दरम्यान, सध्या नागपुरात (Nagpur News) पावसाने विश्रांती घेतली असली तरी अजूनही सकल भागात पाणी साचून आहे. अशातच आता स्मार्ट सिटीतील घनकचरा व्यवस्थापनाच्या अद्यावत यंत्रणेचीही पोलखोल झाली असून महापालिकेने पावसाळ्यापूर्वी सर्व नाले स्वच्छ केल्याचा दावाही फेल ठरला आहे. नागपुरात शनिवारच्या पावसाचा पाणी 10 हजार घरामध्ये शिरल्याच्या प्राथमिक अहवाल महापालिकेने जिल्हा प्रशासनाला दिला आहे, त्यानुसार आता नुकसान भरपाईसाठी सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. हा प्रथमिक अहवाल असून यात पीडित कुटुंबियांचा आकडा अधिक वाढण्याचीही शक्यता आहे. एकुणात या संपूर्ण प्रकारामुळे स्मार्ट सिटीचा लौकिक धुळीला मिळाला असल्याचे बोलले जात आहे.
नुकसान भरपाईसाठी सर्वेक्षणाचे आदेश
नागपुरात शनिवारच्या पाहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र दाणादाण उडवली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक नदी, नाले ओढे ओव्हरफ्लो झाल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील अनेक भागातील घारत, दुकानात पावसाचे पाणी शिरल्याने त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. परिणामी महापालिकेने जिल्हा प्रशासनाला आदर केलेल्या प्राथमिक अहवालात 10 हजार घरामध्ये शिरल्याचे या प्राथमिक अहवालात सांगण्यात आले आहे. मात्र, सर्वेक्षणानंतरच किती घरांमध्ये पाणी शिरून नागरिकांचे नुकसान झाले आहे याचा अंतिम आकडा समोर येऊ शकणार आहे. त्यानुसार आता नुकसान भरपाईसाठी सर्वेक्षण करण्याचे आदेशही देण्यात आले आहे. शनिवारी नागपुरात झालेल्या मुसळधार पावसानंतर अतिवृष्टीची नोंद झाली. परिणामी शहरातील नदी नाल्यांचे पाणी तब्बल दहा हजार घरांमध्ये घुसल्याचा प्राथमिक अहवाल महापालिकेने जिल्हा प्रशासनाला दिला आहे.
शेतीपिकांच नुकसान
तर नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 19 आणि 20 जुलै रोजी झालेल्या पावसानं 347 गावातील 5 हजार 982 हेक्टरवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. राज्य सरकारने काल सोमवारी 33 टक्के पेक्षा अधिक नुकसानी झालेल्या शेताचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे.
फुटपाथ खचून चक्क बारा फुटाचा खड्डा
अशातच नागपूरातील पारडी परिसरात असलेल्या सुभानगरातील फुटपाथ खचून बारा फुटाचा खड्डा पडला असल्याचे समोर आले आहे. बांधकाम सुरू असताना जमीन खचून झालेल्या खोल खड्ड्यामुळे परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खचलेल्या फुटपाथच्या खालून 9.00 एम एम ची सिवर लाईन जाते. पावसामुळे फुटपाथ खालची मातीत खचल्याने ही घटना घडली असल्याचे बोलले जात आहे. त्या ठिकाणी ट्रंक लाईन खराब झाल्याने प्रशासनाकडून सिमेंट रोड व फूटपाथ चे काम करण्यात येत होते. तेव्हा तीन ते चार फुटांचा खड्डा पडला होता. मात्र, नुकताच अचानक मोठ्या प्रमाणावर माती खचली आणि सुमारे 12 फूट खोलीचा खड्डा निर्माण झाला. त्यामुळे अवतीभवतीच्या नागरिकांमध्ये त्यांच्या सुरक्षितते संदर्भात भीती निर्माण झाली आहे. सध्या मनपातर्फे त्या ठिकाणी बॅरिकेडिंग करून सुरक्षेसाठी सँड बॅग लावण्यात आल्या आहेत.
हे ही वाचा