एक्स्प्लोर
(Source: ECI | ABP NEWS)
Onion Export Crisis: कांद्यामुळे शेतकरी हवालदिल, निर्यातबंदीवर तोडगा कधी?
नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजारपेठेतील कांदा निर्यातदारांनी केंद्र सरकारकडे एक महत्त्वाची मागणी केली आहे. बांग्लादेशने कांद्यावर घातलेली आयात बंदी उठवण्यासाठी केंद्र सरकारने त्यांच्याशी चर्चा करावी, असे निर्यातदारांचे म्हणणे आहे. एका कांदा निर्यातदाराने म्हटले आहे की, 'केंद्र सरकारने याच्यात मध्यस्थी करून आणि त्या देशाशी संपर्क साधून तत्काळ निर्यात खुली केली पाहिजे'. बांग्लादेश हा भारताचा सर्वात मोठा कांदा आयात करणारा देश आहे, परंतु जवळजवळ वर्षभरापासून आयात बंदी कायम आहे. यामुळे भारतातील, विशेषतः महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून त्यांना कवडीमोल भावाने कांदा विकावा लागत आहे. सध्या लासलगावमध्ये कांद्याचे भाव केवळ १३ ते १७ रुपये प्रति किलो आहेत, तर बांग्लादेशमध्ये हेच भाव १००टका (Bangladeshi Taka) पर्यंत पोहोचले आहेत. जर निर्यात पुन्हा सुरू झाली, तर भारतीय शेतकऱ्यांना प्रति किलो किमान २ ते ५ रुपयांचा अधिक दर मिळू शकतो, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्र
CMST Bag Found : मुंबईतील CSMT बाहेर संशयास्पद बॅग; परिसरात काही काळ तणाव
Lalu Prasad Yadav Son : लालू प्रसादचे दोन्ही पुत्र पिछाडीवर, एनडीए 30 च्या उंबरठ्यावर
Sudhir Mungantiwar On Bihar Election : आजच्या निकालात एनडीएची सुनामी पाहायला मिळेल, मुनगंटीवारांना विश्वास
Congress Denies Alliance With MNS - MIM : काँग्रेसची भूमिका पक्की,मनसे,एमआयएमला सोबत न घेण्यावर ठाम
Mahapalikecha Mahasangram Ichalkaranji : प्रशासक कामावर इचलकरंजीकर नाराज; नगरसेवकांकडून अपेक्षा काय?
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























