एक्स्प्लोर

Vidarbha Rain : पूर्व विदर्भात दोन महिन्यातील अतिवृष्टीत तब्बल चाळीस जणांचा बळी, तर 144 पशूंची हानी 

Maharashtra Rain Update : वीज कोसळल्याने सर्वाधिक जणांना आपला जीव गमवावा लागला असून पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळेही अनेकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. 

Vidarbha Rain Update : गेल्या दोन महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे (Maharashtra Rain Update) पूर्व विदर्भातील 40 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच शेकडो पशूधनाचीही हानी झाली आहे. या पावसामुळे आतापर्यंत 30 हजार 599 हेक्टर शेत पिकांचेही नुकसान झाल्याचं समोर आलं आहे. 

नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसात झालेल्या दमदार पावसामुळे 30 हजार 599 हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. तर बाधित शेतकऱ्यांची संख्या 38 हजार 820 एवढी आहे. आतापर्यंत नुकसान झालेल्या शेतीचे 52 टक्के पंचनामे पूर्ण झाले असून उर्वरित पंचनामे 5 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती नागपूर विभागाच्या विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिली आहे.

दरम्यान 1 जून पासून 31 जुलैपर्यंत झालेल्या पावसाळ्याच्या दोन महिन्यात पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात तब्बल 40 जणांनी जीव गमावले आहे. सर्वाधिक बळी वीज कोसळल्यामुळे गेले आहे. तर अनेकांचा जीव पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळेही गेला आहे. याच कालावधीत 144 पशूंचाही मृत्यू झाला असून 4 हजार 800 पेक्षा जास्त घर किंवा झोपड्यांचे नुकसान झाले आहे. 

शंभर टक्के पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शासनाला अहवाल पाठवू आणि लवकरच पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल असा विश्वास विभागीय आयुक्तांनी व्यक्त केला आहे.

जुलै महिन्यात विदर्भात दमदार पाऊस 

सुरुवातीला कमजोर ठरलेल्या पावसाने जुलै महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात सर्व उणीव भरुन काढली आहे. विदर्भातील (Vidarbha) नऊ जिल्ह्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे. केवळ अमरावती आणि अकोल्यात पाऊस सरासरीपेक्षा खाली असला तरी सामान्य आहे. विदर्भात 1 जून ते 27 जुलैपर्यंत 495.8 मिमी पाऊस झाला आहे, या कालावधीत 446 मिमीच्या अपेक्षेपेक्षा सरासरी 11 टक्के अधिक पाऊस झाला आहे. यामध्ये यवतमाळ 36 तर भंडाऱ्यात सरासरीपेक्षा 25 टक्के अधिक पाऊस झाला आहे.

विदर्भात 27 जुलैपर्यंत झालेला पाऊस 

शहर            मिमी         सरासरी     टक्के 
नागपूर          485           441         7 
गडचिरोली     665          584         16 
चंद्रपूर           595         495         18 
भंडारा           620         489         25
वर्धा              420          398        03
गोंदिया          560          555        01 
यवतमाळ       519          394       36
अमरावती       327         374     उणे 13
अकोला         330         333      उणे 3
बुलढाणा        307         297        03
वाशिम          404         379         07

ही बातमी वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
Advertisement
metaverse

व्हिडीओ

CM Eknath Shinde, Devendra Fadnavs आणि अजित पवार यांची 'वर्षा' बंंगल्यावर बैठकABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 26 June 2024Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 07 AM: 25 June 2024TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 June 2024 : 07 AM :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
Embed widget