(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Subhash Desai : फॉक्सकॉन परत आणण्यासाठी शिंदे, फडणवीसांनी प्रयत्न करावेत, शिवसेना सरकारला वाटेल ते सहकार्य करायला तयार : सुभाष देसाई
फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रयत्न करावेत. यासाठी शिवसेना सरकारला सहकार्य करेल असे मत शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी व्यक्त केलं.
Subhash Desai EXCLUSIVE Interview : फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात परत आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रयत्न करावेत. यासाठी शिवसेना सरकारला वाटेल ते सहकार्य करेल असे वक्तव्य शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai ) यांनी केलं. सध्याच्या मुख्यमंत्र्यांचे केंद्राशी सलोख्याचे संबंध असल्याचेही देसाई म्हणाले.
वेदांता-फॉक्सकॉनचा (Vedanta Foxconn) प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला आहे. यावरुन राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्याचं खापर महाविकास आघाडीवर फोडलं आहे. गेली दोन वर्षे कंपनीला जो प्रतिसाद मिळायला हवा होता, तो कमी पडला असावा, असं सांगत मुख्यमंत्र्यांनी आधीच्या सरकारकडे बोट दाखवलं आहे. या त्यांच्या टीकेनंतर शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर पलटवार केला.
गुजरातने नेहमीच महाराष्ट्राच्या वाट्याचं हिरावून नेलं आहे
आताचे सरकार हे नबळट सरकार असल्याचा पलटवार देखील सुभाष देसाईंनी यावेळी केला. हा प्रकल्प गुजरातला गेला तरी हे सरकार चकार शब्द काढमार नाही याची खात्री इतर राज्यांना आणि भारत सरकारला असल्याचे देसाई म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केंद्र सरकारविरोधात काही बोलणार नाहीत. ते अन्यायाविरोधात आवाज उठवणार नाहीत असेही देसाई यावेळी म्हणाले. गुजरातने नेहमीच महाराष्ट्राच्या वाट्याचं हिरावून नेलं आहे. असे म्हणत सुभाष देसाईंनी गुजरातच्या भूमिकेवर जोरदार हल्लाबोल केला.
हा प्रकल्प महाराष्ट्रात आला पाहिजे, राज्यातील युवकांना रोजगाराची संधी मिळेल
फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. हा प्रकल्प महाराष्ट्रात आला पाहिजे, कारण राज्यातील युवकांना रोजगाराची संधी मिळत असेल तर शिवसेना सर्व सहकार्य करायला तयार असल्याचे देसाई म्हणाले.
दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार
सत्तेची उब असल्यामुळं ते दसरा मेळावा घेणार असल्याचे म्हणत आहेत. मात्र, परंपरेप्रमाण शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवर होतो. यावेळीही तो शिवाजी पार्कवरच होईल असेही सुभाष देसाई म्हणाले. यासाठी पहिला अर्ज शिवसेनेचाच गेला आहे. त्यामध्ये पूर्वी बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर उद्धव ठाकरे मार्गदर्शन करत आले आहेत. त्यामुळं येणारा दसरा मेळावा हा उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख भाषणासह शिवाजी पार्क याठिकाणीच होईल असे सुभाष देसाई यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: