(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ashish Shelar : 'कट कमिशन'मुळे फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याचा संशय, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी : आशिष शेलार
Vedanta Foxconn : वेदांता (Vedanta) आणि फॉक्सकॉन (Foxconn) प्रकरणावरून सध्या महाराष्ट्रात राजकारण तापलं आहे. या प्रकरणावरून भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
Ashish Shelar on Vedanta Foxconn : वेदांता (Vedanta) आणि फॉक्सकॉन (Foxconn) प्रकरणावरून सध्या महाराष्ट्रात राजकारण तापलेलं पाहायला मिळत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यासंदर्भात आता भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी पत्रकार परिषद घेत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. 'वेदांता प्रकल्पासंदर्भात महाराष्ट्रात राजकारण केलं जात आहे. जी विधानं केली जात आहेत. त्याने महाराष्ट्रातून जनतेमध्ये पेंग्विन सेनेमार्फत भ्रम पसरवले जात आहेत. म्हणून त्यावर स्पष्टीकरण देणं गरजेच आहे. काही वर्तमानपत्रांनी यावर अग्रलेख लिहिले आहेत. यात वेदांता प्रकल्प गुजरातला खेचून नेला-गेला तर याचा दुसरा अर्थ असा होतो की हा प्रकल्प महाराष्ट्रात होता. मग हा प्रकल्प महाराष्ट्रात सुरु कधी झाला? या प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारने सर्व परवानगी दिल्या होता का? सवलती दिल्या होत्या का? करारनामा कधी झाला? प्रकल्पासाठी जागा दिली होती का? असे अनेक सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी उपस्थित केले आहेत.
मुख्यमंत्र्यांकडे या प्रकरणाच्या चौकशीची मागणी
भाजप नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत तत्कालीन महाविकास आघाडी सरकार आणि आदित्य ठाकरे यांच्यावर अनेक आरोप करत निशाणा साधला आहे. याशिवाय त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. आशिष शेलार यांनी म्हटलं आहे की, 'आता आम्ही खोटं सहन करणार नाही. मी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तर जर पेंग्विन सेना देणार नसेल तर माझी मुख्यमंत्री यांना मागणी आहे की या विषयावर उच्च स्तरीय चौकशी केली गेली पाहिजे.'
...तर वेदांता-फॉक्सकॉन कंपनीचा प्रकल्प राज्याबाहेर गेलाच नसता : उदय सामंत
वेदांता-फॉक्सकॉन कंपनीचा सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानंतर राज्यातील राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. महाविकास आघाडीकडून शिंदे-फडणवीस सरकारवर होत असलेल्या टीकेला राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले आहे. महविकास आघाडी सरकारने कधीच वेदांता-फॉक्सकॉन कंपनीला पॅकेज दिले नाही. मविआ सरकारच्या काळात हाय पॉवर कमिटीची बैठकदेखील झाली नाही. ही बैठक झाली असती तर वेदांता-फॉक्सकॉन कंपनीचा प्रकल्प राज्याबाहेर गेलाच नसता असा दावा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला.
महत्त्वाच्या इतर बातम्या