एक्स्प्लोर
Advertisement
सार्वजनिक वाहतुकीच्या मागणीसाठी वंचित बहूजन आघाडीचं 'डफली बजाव' आंदोलन
12 ऑगस्टला वंचित बहूजन आघाडीचे राज्यभरातील कार्यकर्ते दिवसभर ठिकठिकाणच्या एसटी बसस्थानक आणि शहर बससेवा स्थानकांसमोर डफली वाजवत आपल्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधणार आहेत.
अकोला : वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अलिकडे सरकारला सातत्यानं 'लॉकडाउन' हटविण्याची मागणी केली आहे. आता केंद्र आणि राज्य सरकारच्या लॉकडाउनविरोधात वंचित बहूजन आघाडी 'डफली बजाव' आंदोलन करणार आहे. राज्यातील सार्वजनिक वाहतूक सुरू करण्याच्या मागणीसाठी 'वंचित'ची ही 'डफली' वाजणार आहे. येत्या 12 ऑगस्टला 'वंचित'कडून राज्यभर हे आंदोलन केलं जाणार आहे. पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी या आंदोलनाची घोषणा केली आहे. राज्यातील नागरी वाहतूक सुरू करण्याची मागणी वंचित बहूजन आघाडी या आंदोलनातून करणार आहे. गेल्या चार महिन्यांपासून राज्यातील सरकारी आणि खाजगी बससेवा बंद आहेत. त्यासोबतच काही अपवाद वगळता अनेक महापालिका क्षेत्रातील शहर बससेवाही बंद आहेत. नागरिकांना यामूळे मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. त्यामूळे राज्यातील नागरी वाहतूक सुरू करण्याची मागणी वंचित बहूजन आघाडी या आंदोलनातून करणार आहे. राज्यातील एसटी बससेवा आणि महानगरांतील सार्वजनिक बससेवा सुरू करण्याची मागणी प्रकाश आंबेडकरांनी सरकारकडे केली आहे.
VIDEO | सरकारने लॉकडाऊन करावं, आम्ही लोकांना लॉकडाऊन मोडण्याचं आवाहन करु : प्रकाश आंबेडकर
12 ऑगस्टला होणार राज्यभर आंदोलन
या दिवशी वंचित बहूजन आघाडीचे राज्यभरातील कार्यकर्ते दिवसभर ठिकठिकाणच्या एसटी बसस्थानक आणि शहर बससेवा स्थानकांसमोर डफली वाजवत आपल्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकार लॉकडाऊन उठवायला तयार नाही. सोबतच ते यासंदर्भात काहीही सवलत द्यायला तयार नसल्याचा निषेध म्हणून हे आंदोलन पुकारल्याचं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं आहे. राज्यात एसटी सेवा बंद असल्याने कामगारांची उपासमार होत असल्याच्या प्रकारांकडे आंबेडकर यांनी सरकारचं लक्ष्य वेधलं आहे. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अद्यापही बंद असल्यानं सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
आंबेडकरांचं जनतेला आंदोलन यशस्वी करण्याचं आवाहन
आंदोलन यशस्वी करण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी विविध समाजघटकांना सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. राज्यातील बाजार समिती, व्यापारी, रिक्षा, दुकानदार, फेरीवाले, लोहार, न्हावी, चांभार आदी समाज संघटनांनी या आंदोलनात सामील होण्याची विनंती प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. या आंदोलनानंतर सर्वसामान्य नागरिकांना भेटून त्यांना या आंदोलनाचे महत्व सांगण्याचं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. यासोबतच वंचित बहूजन आघाडीचा लॉकडाऊनला विरोध का आहे?, यासंदर्भातील भूमिकेबाबतही लोकांमध्ये जनजागृती करण्याचे आदेश प्रकाश आंबेडकर यांनी पक्ष कार्यकर्त्यांना दिले आहेत.
VIDEO | "मुख्यमंत्री साहेब,खुदा होऊ नका, मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीवर प्रकाश आंबेडकरांची तिरकस टीका
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement