Vagsheer Scorpene : सायलेंट किलर असणारी 'वागशीर' पाणबुडीचा जलावतरण कार्यक्रम संपन्न, ट्रायलनंतर भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील होणार
सायलेंट किलर म्हणून ओळखली जाणारी वागशीर टेस्टिंग आणि ट्रायलनंतर भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील होणार आहे. आज वागशीर पाणबुडी लॉन्च करण्यात आली.
Vagsheer Scorpene News : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने निर्माण केलेल्या प्रोजेक्ट 75 च्या स्कॉर्पिन वर्गाची सहावी पाणबुडी 'वागशीर' आज लॉन्च करण्यात आली. वागशीरच्या आजच्या 'जलावतरण' कार्यक्रमात डिफेन्स सिक्रेटरी डॉ. अजय कुमार शर्मा यांच्या मुख्य उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. वागशीर ही स्कॉर्पिन वर्गाची सहावी आणि शेवटची पाणबुडी आहे. आज वागशीर लॉन्च झाल्यानंतर 1 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळासाठी टेस्टिंग आणि ट्रायलसाठी जाणार आहे. सायलेंट किलर म्हणून ओळखली जाणारी वागशीर टेस्टींग आणि ट्रायलनंतर भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील होणार आहे.
वागशीर ही पाणबुडी युद्धासाठी, शत्रूशी दोन हात करण्यासाठी पूर्णपणे तयार होईल. त्यानंतर वागशीरचे कमशनिंग होऊन ती भारतीय नौदलात सामील होणार आहे. माझगाव डॉकने तयार केलेल्या वागशीर पाणबुडीत अत्याधुनिक तंत्रज्ञानसह स्टेल्थ टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. दुश्मनांच्या रडारमध्ये ही पाणबुडी टिपली जात नाही. दुश्मनांच्या रडारमध्ये ही पाणबुडी घेत नाही. यासोबतच advanced acoustic absorption technique, low Radiated noise level,hydro dynamically optimize shape आणि गायडेड वेपनचा उपयोग करुन दुश्मनांसाठी दोन हात करण्याची क्षमता या पाणबुडीमध्ये आहे. या पाणबुडीमध्ये 18 टोरपीडो ट्युब असून टोरपिडो आणि मिसाइल डागण्यासाठी याचा वापर होईल. या पाणबुडीची लांबी 67.5 मीटर तर उंची 12.3 मीटर असून 350 मीटरपर्यंत ही पाणबुडी समुद्रात खोलवर जाऊ शकते. शिवाय पंचेचाळीस ते पन्नास दिवस ही पाणबुडी समुद्रात प्रवास करु शकते.
दरम्यान, ही पाणबुडी विविध प्रकारचे लक्ष ठेवून त्याची जबाबदारी घेऊ शकते. यामध्ये अँटी सरफेस वारफेअर, अँटी सबमरीन वॉर फेअर , इंटेलिजन्स गेदरिंग, एरिया सर्विलन्स या सारखी जबाबदारी ही पाणबुडी सक्षमपणे पार पाडू शकते. आतापर्यंत एमडीएलने तयार केलेल्या स्कॉर्पिन वर्गाच्या कलवरी, खंडेरी, करंज , वेला या पाणबुड्याचा कमशनिंग भारतीय नौदलात झालं आहे. वागशीर पाणबुडीचे टेस्टिंग आणि ट्रायल समुद्रात सुरु आहे.
महत्त्वाच्या बातम्या: