Maharashtra Corona Crisis : आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राला 300 व्हेंटिलेटर्सची मदत, नितीन गडकरींनी मानले आभार
देशात ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे, महाराष्ट्रातही ऑक्सिजनअभावी रुग्ण दगावत आहेत. अशा परिस्थितीत इतर राज्यांकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मदतीसाठी मागणी केली होती. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी तब्बल 300 व्हेंटिलेटर्स महाराष्ट्राला दिले आहेत. वाचा सविस्तर वृत्तांत..
![Maharashtra Corona Crisis : आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राला 300 व्हेंटिलेटर्सची मदत, नितीन गडकरींनी मानले आभार URL CM YS Jagan Mohan Reddy to send 300 Ventilators after Nitin Gadkari's request in state Maharashtra Corona Crisis : आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राला 300 व्हेंटिलेटर्सची मदत, नितीन गडकरींनी मानले आभार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/23/c5851dee6f49cb9e5a57c4f3dc5e05ef_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस जगन मोहन रेड्डी यांच्याकडे व्हेंटिलेटर्सची मागणी केली होती. नागपूरसाठी मुख्यमंत्री रेड्डी यांनी तब्बल 300 व्हेंटिलेटर पाठवल्याबद्दल गडकरींनी त्यांचे आभार मानले आहेत. विशाखापट्टणममधील आंध्र प्रदेश MedTech Zone (AMTZ) या ठिकाणी या व्हेंटिलेटर्सची निर्मिती करण्यात आली आहे.
नितीन गडकरी यांनी उद्योगमंत्री मेकापती गौतम रेड्डी यांना फोन करून मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. व्हेंटिलेटर वेळेवर पाठवल्याबद्दल गडकरींनी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे कौतुकही केले, कारण महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसर्या लाटेत सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. सध्या ऑक्सिजन, व्हेंटिलेटरचा राज्यात मोठ्या प्रमाणात तुटवडा असल्याने ही मिळालेली मदत मोठा दिलासा आहे. विशाखापट्टणम स्टील प्लांटतर्फे महाराष्ट्राला 150 मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा केला आहे.
Oxygen Express : विशाखापट्टणममधून निघालेली ऑक्सिजन एक्स्प्रेस महाराष्ट्रात दाखल, गोंदियातून आढावा
कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुडवडा निर्माण झाला. राज्य सरकार सर्वच स्तरावर इंजेक्शनचा योग्य पुरवठा व्हावा यासाठी प्रयत्न करत असतानाच वर्ध्यातील 'जेनेटेक लाईफ सायन्सेस'ला 30 हजार वायल (कुपी) प्रतिदिन रेमडेसिवीर इंजेक्शन तयार करण्याची परवानगी मिळाली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या प्रयत्नांना मोठं यश मिळालं. नितीन गडकरी यांच्या पाठपुराव्यानंतर केंद्र सरकारकडून ही परवानगी मिळाली.
कोरोनाच्या दुसर्या लाटेने राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशभरातील वैद्यकीय पायाभूत सुविधांना प्रचंड तणावाखाली आणलंय. आंध्र प्रदेश सरकारने सर्व कोविड रुग्णालयांना कोविड रुग्णांवर मोफत उपचार करण्याचे आदेश दिले आहेत. आंध्र प्रदेशात सुरुवातीपासूनच लसीकरणावर भर दिला गेला. उपलब्ध आकडेवारीनुसार आंध्र प्रदेशमध्ये 1.60 कोटींहून अधिकांनी कोरोना प्रतिबंधक लस आतापर्यंत घेतली आहे. आंध्र प्रदेशातील रिकव्हरी रेट 89% असून त्यांचा मृत्यूदर 0.78% आहे. त्यामुळे आंध्र प्रदेशप्रमाणेच इतर सर्व राज्यांनी लसीकरणावर लक्ष केंद्रीत करणं फायद्याचं ठरेल.
संबंधित बातम्या
कोरोना साथीत मंत्री नितीन गडकरी अॅक्टिव्ह मोडवर! फक्त विदर्भ किंवा नागपूरसाठी मदत नाही तर...
नागपूरसाठी गडकरी, फडणवीस यांनी काय केलं? काँग्रेसच्या आरोपांना भाजपचं प्रत्युत्तर
देशातील 30 टक्के वाहन परवाने बोगस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा धक्कादायक खुलासा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)