एक्स्प्लोर
UPSC निकाल : पालघरमधील शेतकऱ्याच्या लेकाचा देशात डंका, हेमंता पाटील 39 वा
हेमंता पाटील हा पालघरमधील वाडा तालुक्यातील शिल्लोत्तर या गावातील विद्यार्थी. हेमंताने आपलं प्राथमिक शिक्षण तलासरीमधील ठक्कर बाप्पा आश्रमशाळेत पूर्ण केलं. पहिलीपासूनच तो कायम अव्वल क्रमांकावर असायचा.

पालघर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा अर्थात यूपीएससी 2018 परीक्षेचे निकाल जाहीर झाले आहेत. पालघर जिल्ह्यातील हेमंता केशव पाटील हा ग्रामीण भागातील शेतकऱ्याचा मुलगा देशात 39 वा तर राज्यात पाचवा आला.
हेमंता हा वाडा तालुक्यातील शिल्लोत्तर या गावातील विद्यार्थी. हेमंताने आपलं प्राथमिक शिक्षण तलासरीमधील ठक्कर बाप्पा आश्रमशाळेत पूर्ण केलं. पहिलीपासूनच तो कायम अव्वल क्रमांकावर असायचा. हेमंताला शिक्षण, वक्तृत्व आणि खेळाचीही आवड आहे.
हेमंताने बारावीपर्यंतचं शिक्षण वाडा तालुक्यातील चंदावरकर कॉलेजमध्ये पूर्ण केलं. विशेष म्हणजे तेव्हाही तो तालुक्यात पहिला आला होता. त्यानंतर हेमंताने रायगड जिल्ह्यातील लोणेरमध्ये केमिकल इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेतला. तिथेही तो गोल्ड मेडलिस्ट ठरला.
यूपीएससी परीक्षेत निवृत्त परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांची कन्या पूजा मुळे देशात अकरावी
शिक्षणानंतर गुजरातमधील अंकलेश्वरमध्ये हेमंताला नोकरी मिळाली, मात्र त्यामुळे लोकसेवा परीक्षांचा अभ्यास करता येणार नाही, म्हणून आई-वडील आणि मोठा भाऊ विकास यांच्या सल्ल्याने त्याने नोकरीला रामराम ठोकला. VIDEO | महाराष्ट्राची सृष्टी देशमुख देशात पाचवी, कनिष्क कटारिया पहिला हेमंताने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यूपीएससी परीक्षा देण्याचा विचार केला. गेल्या वर्षी हेमंता देशात 696 व्या रँकवर आला आणि त्याला आयआरएफ पदवी मिळाली. मात्र तिथेही न थांबता हेमंताने पुन्हा कठोर मेहनत करुन परीक्षा दिली. आता तो देशात 39 वा, तर राज्यात पाचवा यशस्वी विद्यार्थी ठरला आहे.यूपीएससी परीक्षेत देशात महिलांमध्ये अव्वल मराठमोळ्या सृष्टी देशमुखचा कानमंत्र
हेमंताचे वडील केशव पाटील हे साध्या शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांनी तलासरीसारख्या ठिकाणी आपला शिक्षकी पेशा पूर्ण करुन मुलांना संस्कार आणि शिक्षण दिल्यामुळे हे यश प्राप्त करता आलं, असं मत हेमंताने व्यक्त केलं.आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement





















