एक्स्प्लोर

Bhajani Mandal Grant : भजनी मंडळाना साहित्य खरेदीसाठी 25000 रुपये मिळणार, अनुदानासाठी अर्ज कसा करायचा?

Bhajani Mandal Grant : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून भजनी मंडळांना 25 हजार रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे.

Ganesh Festival 2025  मुंबई :  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना अनुदान दिलं जातं. 2025 पासून  गणेशोत्सवाला महाराष्ट्राचा राज्य महोत्सव म्हणून दर्जा देण्यात आला आहे. गणेशोत्सव या राज्य महोत्सवांतर्गत भजनी मंडळांना मिळणार भांडवली अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिलं आहे. राज्यतील 1800 भजनी मंडळांना भजन साहित्य खरेदीसाठी 25000 रुपये भांडवली अनुदान दिलं जाणार आहे 

भजन साहित्य खरेदीसाठी अनुदान

यावर्षीपासून प्रथमच गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आलेला आहे. यानिमित्ताने राज्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि उपक्रमांचे आायोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून राज्याभरातील 1800 भजनी मंडळांना भजन साहित्य खरेदीसाठी 25000 रुपये भांडवली अनुदान वितरण करण्यात येणार आहे, असा निर्णय सांस्कृतिक कार्य विभागानं घेतल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली.

14 ऑगस्टच्या शासन निर्णयानुसार राज्यातील नोंदणीकृत तसेच भजन क्षेत्रातील शिखर संस्थांनी प्रमाणित केलेल्या भजनी मंडळांना भांडवली खर्चासाठी अनुदान देण्यात येणार आहे. या संदर्भातील अटी व शरतींचा शासन निर्णय स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील. यासाठी ५ कोटी रुपये इतकी तरतूद करणे, असा उल्लेख त्या शासन निर्णयात होता.

ऑनलाईन अर्ज करावा लागणार

भजनी मंडळांना 25 हजार रुपयांचं अनुदान मिळवण्यासाठी  https://mahaanudan.org या वेबसाईटवर अर्ज दाखल करावे लागतील. याबाबतचे ऑनलाईन अर्ज दिनांक 23 ऑगस्ट, 2025 ते 06 सप्टेंबर, 2025 या कालावधीत https://mahaanudan.org या वेबपोर्टलवर उपलब्ध आहेत. जास्तीत जास्त भजनी मंडळांनी या अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले आहे.

अर्ज कसा करायचा?

महाराष्ट्रातील ज्या भजनी मंडळांना भजनाचं साहित्य खरेदी करण्यासाठी 25 हजार रुपयांचं अनुदान मिळवायचं असेल त्यांना पहिल्यांदा  https://mahaanudan.org या वेबसाईटला भेट देऊन अर्ज करावा लागेल. अर्ज सादर करताना प्रथम नोंदणी करावी लागेल. यासाठी भजनी मंडळ कोणत्या प्रशासकीय विभागातील आहे हे निवडावं लागेल, त्यानंतर जिल्हा, तालुका निवड केल्यानंतर गाव किंवा नगर पालिका, नगर पंचायत निवड करावी लागेल. यानंतर  भजनी मंडळाचं नाव, भजनी मंडळाचा पत्ता आणि मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी नोंदवावा लागेल. यानंतर लॉगीन करुन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. 

ST Employees : मोठी बातमी : ST कर्मचाऱ्यांना बाप्पा पावणार? पुढील महिन्याचा पगार गणेशोत्सवापूर्वीच मिळण्यासाठी परिवहन मंत्र्यांच्या हालचाली

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शशिकांत शिंदे यांच्या वक्तव्याने राज्यात मोठ्या भूकंपाचे संकेत; म्हणाले, शरद पवारांची राष्ट्रवादी अन् शिंदेंच्या शिवसेनेची युती ही भविष्याची नांदी
...तर शरद पवारांची राष्ट्रवादी अन् शिंदेंच्या शिवसेनेची युती ही भविष्याची नांदी ठरेल; शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य, राज्यात मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत?
Bogus Voters List : रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
मनमाडमधील प्रभाग 10 ची निवडणूक रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय; धुळे अन् गेवराईत काय होणार?
मनमाडमधील प्रभाग 10 ची निवडणूक रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय; धुळे अन् गेवराईत काय होणार?
मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mumbai Controversy : 'बॉम्बे'चा डाव, 'मुंबई'वर घाव? आयआयटी बॉम्बे की आयआयटी मुंबई? Special Report
Shiv Sena VS BJP : राजकीय रामलीला, सेना - भाजपचा कल्ला! राज्याच्या सत्तेत दोस्ती, पालघरच्या आखाड्यात कुस्ती Special Report
Zero Hour Full : महायुतीचा जोमात प्रचार, मविआचे बडे नेते मात्र प्रचारापासून दूरच; कारण काय?
Mahapalikecha Mahasangram Bhusawal:भुसावळ-नगरपरिषदेचा महासंग्राम, नराध्यक्षांकडून नागरिकांना अपेक्षा
Mahapalikecha Mahasangram Alibag : निवडणुकीबाबत काय वाटतं अलिबागकरांना? शेकाप पुन्हा सत्ता राखणार?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शशिकांत शिंदे यांच्या वक्तव्याने राज्यात मोठ्या भूकंपाचे संकेत; म्हणाले, शरद पवारांची राष्ट्रवादी अन् शिंदेंच्या शिवसेनेची युती ही भविष्याची नांदी
...तर शरद पवारांची राष्ट्रवादी अन् शिंदेंच्या शिवसेनेची युती ही भविष्याची नांदी ठरेल; शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य, राज्यात मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत?
Bogus Voters List : रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
मनमाडमधील प्रभाग 10 ची निवडणूक रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय; धुळे अन् गेवराईत काय होणार?
मनमाडमधील प्रभाग 10 ची निवडणूक रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय; धुळे अन् गेवराईत काय होणार?
मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
भाजप उमेदवारांना निवडून द्या, तुमचा 'तो' प्रश्न मार्गी लावतो; बावनकुळेचं फोनवरुन लोणावळ्यात आश्वासन
भाजप उमेदवारांना निवडून द्या, तुमचा 'तो' प्रश्न मार्गी लावतो; बावनकुळेचं फोनवरुन लोणावळ्यात आश्वासन
Ahilyanagar crime: मोठी बातमी: शरद पवार गटाच्या नेत्यावर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला, धारदार सत्तूर अंगावर सपासप चालवली, राम खाडेंची प्रकृती चिंताजनक
मोठी बातमी: शरद पवार गटाच्या नेत्यावर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला, गंभीर जखमी
मोठी बातमी! महापालिका मतदार याद्यांतील घोळ समोर, सूचना व हरकतीला मुदतवाढ; निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय
मोठी बातमी! महापालिका मतदार याद्यांतील घोळ समोर, सूचना व हरकतीला मुदतवाढ; निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2025 | बुधवार
Embed widget