नेत्यांच्या घरात बसून प्रभाग रचना, प्रत्येक मतदारसंघात 10 हजारांहून अधिक मते घुसवली; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप, जयंत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
Jayant Patil: माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या मतदारसंघात झालेल्या आरोपानंतर जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना खोचक टोला लगावला.

Sharad Pawar: निवडणूक आयोग स्वच्छ भूमिका घेत नाही. निवडणूक आयोग स्वतंत्र आहे. मात्र त्यांनी त्याची भूमिकाजी घ्यायला हवी होती ती घेतली नाही. निवडणूक आयोगाकडून आमची फार काही अपेक्षा नसल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. राहुल गांधी यांनी हे सर्व सत्य समोर आणलं, मात्र याची सुरूवात बिहारमधून झाली. आज बिहारमध्ये राहुल गांधींचा गौरव सुरू आहे. बिहार आर्थिकदृष्या अडचणीचं राज्य आहे. त्यांचे काही प्रश्न असतील मात्र राजकियदृष्ट्या ते राज्य जागरूक आहे आणीबाणच्या काळात पहिला संघर्ष बिहारमद्ये झाल्याचे ते म्हणाले. राहुल गांधी यांच्या माहितीत एका झोपडपट्टीत एका घरात 140 लोकं राहत असल्याचे समोर आल्याचे शरद पवार म्हणाले. राष्ट्रवादीकडून मतदारयाद्यांवर अभ्यास सुरु करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दुसरीकडे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या मतदारसंघात झालेल्या आरोपानंतर जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना खोचक टोला लगावला. मुख्यमंत्र्यांनी मतदारयाद्यांमधील घोळ मान्य केला असून त्यांनी आमच्या मागणीला पाठिंबा द्यावा, असे म्हणाले. जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्येक मतदारसंघात 10 ते 15 नावे घुसवली जात असल्याचा गंभीर आरोप केला. प्रभाग रचना नेत्यांच्या घरातून होत असल्याचा आरोपही त्यांनी केली.
निकाल वेगळा लागेल
दरम्यान, उपराष्ट्रपती निवडणुकीवर शरद पवार म्हणाले की, आम्ही सगळ्यांनी मिळून दोन ते तीन नावाची चर्चा केली. त्यानंतर सर्वांचं एकमत झालं. सत्ताधाऱ्यांकडून उमेदवार जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला. महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत म्हणून सहकार्य करावे ही विनंती केली. तथापि, मी शक्य नाही म्हटलं असल्याचे ते म्हणाले कारण ते वेगळ्या विचाराचे आहेत. मुख्यमंत्र्याच्या विनंतीवर मी शक्य नसल्याचे सांगितले. राऊतांशी बोलणं झालं असून त्यांचीही चर्चा झाली. त्यांचा आणि आमचा निर्णय एकच आहे. आम्ही आमचं बघतो त्यांनी काय करायचं ते ठरवतील, निकाल वेगळा लागेल. त्यांनी पुढे सांगितले की, आम्ही सरकारचा विचार करत नाही. गेल्यावेळी 300 खासदार रस्त्यावर उतरले. आम्हाला अटक करण्यात आली.
मतदारयाद्यांमधील घोळ मुख्यमंत्र्यांनी मान्य केला
दरम्यान, जयंत पाटील यांनी सांगितले की, मतदारयादीत एका घरात 18 नावं असून एका घरात दुसरं कोणी आहे. काही ठिकाणी घरांसमोर 0 त्या पुढे 00 असं दिसतं. कलेक्टरांना सांगूनही आता तेवढा वेळ नाही हे उत्तर दिलं जातं. पृथ्वीराज चव्हाणांच्या पुतण्यावर आरोप करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या टीकेनंतर जयंत पाटील यांनी खोचक टोला लगावत त्यांनी मतदारयाद्यांमधील घोळ मान्य केल्याचे ते म्हणाले. त्यामुळे त्यांनी आमच्या विनंतीला पाठिंबा द्यावा असे ते म्हणाले.
आव्हाडांचा गंभीर आरोप
दुसरीकडे, जितेंद आव्हाड यांनी प्रत्येक मतदारसंघात 10 हजाराहून अधिक मत घुसवली जात असल्याचा आरोप. प्रभाग रचना घरातून केली जात असल्याचा गंभीर आरोप केला.
इतर महत्वाच्या बातम्या























