एक्स्प्लोर

जे लोक खड्ड्यांवरून आंदोलन करतात त्यांच्याकडे कोणतही काम राहिलेलं नाही : मंगलप्रभात लोढा

Mangalprabhat Lodha: मंगलप्रभात लोढा म्हणाले की, जे लोक खड्ड्यांवरून आंदोलन करतात. त्यांच्याकडे कोणतही काम राहिलेलं नाही. मग करायचं काय म्हणून ते आंदोलन करत आहेत.

Mangalprabhat Lodha on potholes: मुंबईसह राज्यात पावसाने दैना केल्यानंतर आता रस्त्यांची पार चाळण होऊन गेली आहे. दरम्यान, खड्ड्यातील रस्त्यांसाठी टोल आकारला जाऊ शकत नाही, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला. असे असतानाही मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी रस्त्यांवरून आंदोलन करणाऱ्यांना काम नसल्याचे म्हटले आहे. मुंबई महापालिकेने काम सुरू केलं असून गणपतीपूर्वी सगळे खड्डे बुजवले जातील, असे लोढा यांनी म्हटले आहे.

करायचं काय म्हणून ते आंदोलन करत आहेत

मंगलप्रभात लोढा म्हणाले की, जे लोक खड्ड्यांवरून आंदोलन करतात. त्यांच्याकडे कोणतही काम राहिलेलं नाही. मग करायचं काय म्हणून ते आंदोलन करत आहेत. जिथं पॅचवर्क निघालं असेल तिथं देखील दुरुस्ती केली जाईल. गणपतीपूर्वी सगळे खड्डे बुजवले जातील, असे लोढा यांनी म्हटले आहे. 

खड्ड्यांवरून मनसे आक्रमक 

दरम्यान, मुंबईत रस्त्यांवर झालेल्या मोठ्या प्रमाणात खड्ड्यांवरून मनसे आक्रमक झाली आहे. मनसेकडून आज चांदिवलीमध्ये आंदोलन करण्यात आले. एनएसएस रोडवर पडलेल्या खड्ड्यात उभे राहून मनसेनं आंदोलन केले. स्थानिक नागरिक या खड्ड्यांमुळे जखमी झाले आहेत, आणखी होऊ शकतात याचे प्रतीकात्मक रूप म्हणून जखमी कार्यकर्त्यांना उभं करण्यात आले. यावेळी पालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आता जिथे जिथे खड्डे असतील तिथे तिथे मनसे आंदोलन करेल असा इशारा यावेळी मनसेचे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांनी दिला.

रस्ता बनवा, तो खराब झाला की पुन्हा टेंडर काढा

दरम्यान, रस्ते बांधकामाचे टेंडर काढा, रस्ता बनवा, तो खराब झाला की पुन्हा टेंडर काढा, हा नवा धंदा सुरू झाला आहे' अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रस्त्यांच्या दुरवस्थेवर टीका केली. शिवतीर्थवर गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी रस्त्यांवरून जोरदार टीका केली. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत मुंबई शहर नियोजनाचा लघुआराखडा सादर करत चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नांवर सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे राज यांनी सांगितले.  राज म्हणाले की, गेल्या काही महिन्यांपासून ते मुख्यमंत्र्यांशी शहर नियोजनासह विविध विषयांवर संवाद साधत आहेत. मुसळधार पावसामुळे पाणी साचणे, रस्त्यांवरील खड्डे, वाहतुकीतील अडचणी, अनधिकृत पार्किंग यांसारखे गंभीर मुद्दे असले तरी, या भेटीत वाहतुकीसंदर्भात विशेष चर्चा झाली. प्रेझेंटेशनवेळी वाहतुकीसंदर्भातील पोलिस आयुक्तही उपस्थित होते.  

इतर महत्वाच्या बातम्या

 

About the author सचिन गाड

सचिन गाड, प्रतिनिधी, एबीपी माझा

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Kishor On Sunil Tatkare Sunetra Pawar NCP Politics: प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Mumbai Local Train Marathi News: लोकलमधील पीडितेबाबत धक्कादायक माहिती; आरोपीने सांगितलेलं ती ट्रान्सजेंडर, आता पोलिसांच्या तपासातून सगळं आलं समोर!
लोकलमधील पीडितेबाबत धक्कादायक माहिती; आरोपीने सांगितलेलं ती ट्रान्सजेंडर, आता पोलिसांच्या तपासातून सगळं आलं समोर!
अजितदादांना न्याय कधी मिळणार? राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचं आंदोलन, सूरज चव्हाणांसोबत बाचाबाची, पोलीस घटनास्थळी
अजितदादांना न्याय कधी मिळणार? राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचं आंदोलन, सूरज चव्हाणांसोबत बाचाबाची, पोलीस घटनास्थळी

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Russia Sanctions 100 Percent Tariff On India: भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
Mumbai Local Train Marathi News: लोकलमधील पीडितेबाबत धक्कादायक माहिती; आरोपीने सांगितलेलं ती ट्रान्सजेंडर, आता पोलिसांच्या तपासातून सगळं आलं समोर!
लोकलमधील पीडितेबाबत धक्कादायक माहिती; आरोपीने सांगितलेलं ती ट्रान्सजेंडर, आता पोलिसांच्या तपासातून सगळं आलं समोर!
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Embed widget