एक्स्प्लोर

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणावर हायकोर्टाची देखरेख हवीच, कुटुंबियांची विनंती

तीन आठवड्यांत सीबीआयच्या नव्या तपासअधिका-यांना भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश'यात आता हायकोर्टानं लक्ष घालू नये', अशी मागणी करत शरद कळसकर आणि विक्रम भावे या आरोपींची हायकोर्टात याचिका

Update on Dr. Dabholkar murder case from HC: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयाची देखरेख आवश्यक आहे. अशी विनंती करत दाभोळकर कुटुंबियांनी आरोपींची याचिका फेटाळून लावण्याची मागणी हायकोर्टाकडे केली आहे. याप्रकरणी आरोपपत्र दाखल होऊन पुणे सत्र न्यायालयात खटलाही सुरू झाला आहे. त्यामुळे कायद्यानुसार आता मुंबई उच्च न्यायालयानं या प्रकरणावर देखरेख ठेवण्याची गरज नाही, अशी मागणी करत या प्रकरणातील दोन आरोपींनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यांच्या या मागणीवर भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश हायकोर्टानं दाभोलकर कुटुंबीयांना दिले होते. त्यांनी यास विरोध केल्यानं हायकोर्टानं सीबीआयच्या नव्या तपासअधिका-यांना याबाबत आपली भूमिका तीन आठवड्यांत स्पष्ट करण्याचे निर्देश देत प्रकरणाची सुनावणी 30 जानेवारीपर्यंत तहकूब केली आहे. दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास करणारे सीबीआय अधिकारी 31 डिसेंबर रोजी निवृत्त झाल्यानं त्यांच्याजागी नव्या अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी बुधवारी सुनावणी झाली. त्यावेळी कायद्यानुसार, आरोपपत्र दाखल केल्यानंतर उच्च न्यायालयाने तपासावर आता देखरेख ठेवू नये. तेव्हा न्यायालयानंही या प्रकरणाच्या तपासावर आता देखरेख ठेवू नये, अशी मागणी आरोपी शरद कळसकर आणि विक्रम भावे यांच्यातर्फे न्यायालयाकडे करण्यात आली आहे. त्यावर आपलं उत्तर दाखल करत दाभोलकर कुटुंबियांचे वकील अभय नेवगी यांनी या मागणीला विरोध केला आहे. याप्रकरणी अद्याप काही आरोपी फरार आहेत, हत्येकरता वापरलेलं हत्यार, बाईक या गोष्टी अजूनही सापडलेल्या नाहीत. याशिवाय या हत्येमागचं नेमकं कारण आणि त्याचे सूत्रधार कोण याचाही शोध लागायचाय. त्यामुळे याप्रकरणी हायकोर्टाची देखरेख आवश्यकच असल्याचं त्यांनी कोर्टाला सांगितलं.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकरांची 20 ऑगस्ट 2013 मध्ये पुण्यात हत्या करण्यात आली होती. दाभोलकर हत्या प्रकरणात केल्या जाणाऱ्या तपासबाबत वारंवार असमाधान व्यक्त करून दाभोलकर कुटुंबीयांनी हायकोर्टात धाव घेतली होती. पोलीस यंत्रणा योग्य तपास करत नसल्याचा आरोप करत काही वर्षांपूर्वी हा तपास हायकोर्टाच्या देखरेखीखाली सीबीआयमार्फत मागणी करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला होता. सीबीआयनं याप्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रावर सध्या पुणे सत्र न्यायालयातील विशेष कोर्टात आरोपींविरोधात खटला सुरू आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मोठी बातमी: मुंबईतील कुर्ला परिसरात गोळीबार, हलाव पूलाजवळ दोन गटात वाद, तीन गोळ्या झाडल्या
Maharashtra Live blog updates: मुंबईतील कुर्ला परिसरात गोळीबार, हलाव पूलाजवळ दोन गटात वाद, तीन गोळ्या झाडल्या
Anil Patil : गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी कर्तव्यात कसूर करून गोपनीयतेचा भंग केलाय; आमदार अनिल पाटील यांची मागणी; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरही मोठं भाष्य, म्हणाले....
गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी कर्तव्यात कसूर करून गोपनीयतेचा भंग केलाय; आमदार अनिल पाटील यांची मागणी; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरही मोठं भाष्य, म्हणाले....
अजित दादांच्या प्रथम स्मृतीदिनाआधी दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं; अमोल मिटकरींनी नेमकं काय म्हटलं
अजित दादांच्या प्रथम स्मृतीदिनाआधी दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं; अमोल मिटकरींनी नेमकं काय म्हटलं
Anna Hazare: अण्णांच्या आंदोलनाला भाजप-आरएसएसचा छुपा पाठिंबा होता, सोनिया गांधींच्या वक्तव्यानंतर अण्णा हजारेंचा पलटवार, म्हणाले....
अण्णांच्या आंदोलनाला भाजप-आरएसएसचा छुपा पाठिंबा होता, सोनिया गांधींच्या वक्तव्यानंतर अण्णा हजारेंचा पलटवार, म्हणाले....

व्हिडीओ

Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल
Satej Patil PC : धमक्या कुणाला देताय? मी सुद्धा पाटील, ३-३ मंत्र्यांना उत्तर UNCUT PC
Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nvidia CEO Jensen Huang and Alice Huang: अमेरिकेच्या बड्या टेक कंपनीच्या CEO चं चिनी गुप्तहेर महिलेसोबत लफडं कसं बाहेर आलं, जगाचं लक्ष का?
अमेरिकेच्या बड्या टेक कंपनीच्या CEO चं चिनी गुप्तहेर महिलेसोबत लफडं कसं बाहेर आलं, जगाचं लक्ष का?
Ravindra Dhangekar: महायुतीत असलो तरी जे काही चाललंय ते लोकशाहीला घातक; जे पेरलंय तेच उगवेल, शेवट वाईट होईल! रवींद्र धंगेकरांचा इशारा
महायुतीत असलो तरी जे काही चाललंय ते लोकशाहीला घातक; जे पेरलंय तेच उगवेल, शेवट वाईट होईल! रवींद्र धंगेकरांचा इशारा
अजित दादांच्या प्रथम स्मृतीदिनाआधी दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं; अमोल मिटकरींनी नेमकं काय म्हटलं
अजित दादांच्या प्रथम स्मृतीदिनाआधी दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं; अमोल मिटकरींनी नेमकं काय म्हटलं
Sunetra Pawar : 'जशी वेळ येईल तशा गोष्टी....', भेटीगाठी अन् राष्ट्रवादींच्या विलीनीकरणावर सुनेत्रा पवारांचं सूचक वक्तव्य, नेमकं काय म्हणाल्या?
'जशी वेळ येईल तशा गोष्टी....', भेटीगाठी अन् राष्ट्रवादींच्या विलीनीकरणावर सुनेत्रा पवारांचं सूचक वक्तव्य, नेमकं काय म्हणाल्या?
Keshav Upadhye on Sonia Gandhi: बाबरीवर दुःखाचे अश्रू, पण बोफोर्सवर मौन का? सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर केशव उपाध्येंचे रोखठोक सवाल, म्हणाले, 'आत्मचरित्रातून स्वतःची प्रतिमा कितीही उजळवली...'
बाबरीवर दुःखाचे अश्रू, पण बोफोर्सवर मौन का? सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर केशव उपाध्येंचे रोखठोक सवाल, म्हणाले, 'आत्मचरित्रातून स्वतःची प्रतिमा कितीही उजळवली...'
Hardik Pandya Mumbai Indians: बाय गुडबाय! अखेर मुंबई इंडियन्सचा हार्दिक पांड्याला निरोप, आठवणींना उजाळा देणारा व्हिडीओ शेअर
बाय गुडबाय! अखेर मुंबई इंडियन्सचा हार्दिक पांड्याला निरोप, आठवणींना उजाळा देणारा व्हिडीओ शेअर
Ravindra Dhagekar and Chandrakant Patil: अहो चंद्रकांतदादा, सतेज पाटलांचे वडील स्कुटरवरुन फिरायचे, पण तुम्ही काय किर्लोस्करांचे नातू-बितू होतात का? रवींद्र धंगेकरांचा खोचक सवाल
अहो चंद्रकांतदादा, सतेज पाटलांचे वडील स्कुटरवरुन फिरायचे, पण तुम्ही काय किर्लोस्करांचे नातू-बितू होतात का? रवींद्र धंगेकरांचा खोचक सवाल
NCP MLA and Sharad Pawar: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान मोठी घडामोड! 'सिल्व्हर ओक'वर शरद पवारांच्या भेटीसाठी वेळ मागितली, पण...; समोर आली नवी माहिती
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान मोठी घडामोड! 'सिल्व्हर ओक'वर शरद पवारांच्या भेटीसाठी वेळ मागितली, पण...; समोर आली नवी माहिती
Embed widget