अवघ्या दीड महिन्यात सैन्यातील पती अन् सासऱ्यांचे निधन, चिमुरडी लेक पदरात; खडतर संघर्षात खचून न जाता कोल्हापूरच्या प्रियांका खोत यांची लेफ्टनंटपदी नियुक्ती
चेन्नईमध्ये झालेल्या ऑफिसर ट्रेनिंग अकादमीमध्ये पासिंग आऊट परेडमध्ये प्रियांका यांची लेफ्टनंटपदी नियुक्ती करण्यात आली. प्रियंका खोत यांनी अत्यंत समर्थपणे केलेली ही कामगिरी उल्लेखनीय ठरलेली आहे.

Priyanka Khot from Kolhapur appointed as a lieutenant: कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात तीन वर्षांपूर्वी पतीचे निधन झाल्यानंतर अत्यंत धैर्याने, नियोजनबद्ध तयारी करून तारदाळ येथील प्रियांका निलेश खोत यांची सैन्य दलात नियुक्ती झाली आहे. चेन्नईमध्ये झालेल्या ऑफिसर ट्रेनिंग अकादमीमध्ये पासिंग आऊट परेडमध्ये प्रियांका यांची लेफ्टनंटपदी नियुक्ती करण्यात आली. प्रियंका खोत यांनी अत्यंत समर्थपणे केलेली ही कामगिरी उल्लेखनीय ठरलेली आहे.
पतीचे अकाली निधन
7 नोव्हेंबर 2022 रोजी निलेश खोत यांचे सैन्य दलात असताना हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यानंतर प्रियांका खचल्या होत्या. निराशेच्या गर्तेत गेलेल्या प्रियंका यांना कुटुंबीयांनी सावरण्यास मदत केली. निलेश खोत हे सैन्य दलात असल्याने सैन्य दलाविषयी प्रियांका खोत यांना बरीच माहिती होती. त्यांनी सुरुवातीला बँकिंग स्पर्धा परीक्षा देण्याची तयारी केली होती. परंतु, सैन्य दलातील काही अधिकाऱ्यांनी सैन्य दलात सहभागी होण्याची संधी कशी आहे याविषयी मार्गदर्शन केले. त्यासाठी तुमच्याकडे आवश्यक ती शैक्षणिक पात्रता असल्याचेही जाणवून दिले. त्यानुसार प्रियांका यांनी सैन्य दलात भरती होण्यासाठी तयारी सुरू केली. त्यासाठी त्यांनी नोएडात चार महिने विशेष प्रशिक्षण घेतले. सैन्य दलात सहभागी होण्यासाठी आवश्यक असणारी प्रवेश परीक्षा त्या यशस्वीपणे उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर त्या 11 महिन्याच्या प्रशिक्षण शिबिरात सहभागी झाल्या. आणि आता त्या उत्तीर्ण झाल्यानंतर सैन्य दलात सहभागी होण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. 26 सप्टेंबरपासून त्या सैन्य दलात प्रत्यक्ष सेवा बजावणार आहेत.
#WATCH | Chennai, Tamil Nadu: Officer Cadet Priyanka Nilesh Khot, wife of Late Naik Nilesh Khot, says, "I am the wife of Late Naik Nilesh Khot. I belong to a village in the Kolhapur district of Maharashtra. Today, I was commissioned in the ordinance. This is truly a special… https://t.co/8XfQvShrJw pic.twitter.com/8QjqxLn7X8
— ANI (@ANI) September 6, 2025
गावामध्ये जंगी मिरवणूक
प्रियांका खोत यांच्या अभिमानास्पद कामगिरीनंतर तारदाळ गावच्या ग्रामस्थांनी जंगी मिरवणूक काढत त्यांचा सन्मान केला. गावकऱ्यांनी केलेल्या सन्मानानंतर प्रियांका भारावरून गेल्या. आपल्या यशात कुटुंबाने दिलेल्या पाठिंब्याचा मोठा वाटा असल्याचे सांगितले. जंगी सत्कारानंतर प्रियांका यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना प्रियांका गेल्या 11 महिन्यातील खडतर प्रशिक्षणाची माहिती दिली. विपरीत परिस्थिती असतानाही यशस्वी ठरल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
इतर महत्वाच्या बातम्या






















