एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Unseasonal Rain : राज्याला अवकाळी पावसाचा फटका; अजित पवारांनी बोलावली तातडीची बैठक

Unseasonal Rain : आज संध्याकाळी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राज्यातील नुकसानाचा आढावा घेतला जाणार आहे.

मुंबई : राज्यातील गारपिटीने आणि अवकाळीने (Unseasonal Rain) नुकसान झालेल्या भागाची माहिती घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी तातडीची बैठक बोलावली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज संध्याकाळी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या उपस्थितीत राज्यातील नुकसानाचा आढावा घेतला जाणार आहे. तर, केंद्राकडून अवकाळी आणि गारपिटीने फटका बसलेल्या शेतीला मदत मिळवण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून सध्या केंद्र सरकारकडे चाळीस दुष्काळी तालुक्यांसाठी 2600 कोटींच्या मदतीची मागणी करण्यात आली असून, यावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. 

पुढील दहा दिवसात राज्यातील नुकसान झालेल्या भागाचे पंचनामे तयार करून अहवाल सादर करण्याचे सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहे. नुकसान झालेल्या भागाचा अहवाल प्राप्त होताच केंद्राकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. सध्या राज्य सरकार तातडीची मदत देण्यासंदर्भात प्रयत्नशील असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर आज बोलवण्यात आलेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे अनिल पाटील नाशिकमधील निफाड तालुक्यातल्या नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेण्यासाठी काही वेळात पोहचणार आहे. स्वतः बांधावर जाऊन पाहणी करून त्यानंतर तत्काळ मुंबईत बैठकीसाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. 

तातडीने मदत करण्याची शक्यता... 

आधीच राज्यातील अनेक भागात दुष्काळ सदृश परिस्थिती असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. खरीप हंगाम वाया गेला असून, रब्बी हंगामातून काहीतरी हाती लागण्याची अपेक्षा होती. मात्र, परवापासून राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने मदतीची गरज असून, ही बाब लक्षात घेता अजित पवारांनी तत्काळ बैठक बोलावली आहे. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांना तातडीने कशाप्रकारे मदत पोहचवता येईल यावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. तर, कृषिमंत्री धनंजय मुंडे आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील हे देखील या बैठकीत उपस्थित राहणार आहे. त्यामुळे या बैठकीत कोणते निर्णय घेतले जातात हे पाहणं महत्वाचे असणार आहे. 

शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान...

राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यानुसार राज्यात परवापासून अवकाळी पाऊस कोसळताना पाहायला मिळत आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. अतिवृष्टी व गारपिटीने 17 जिल्ह्यांमध्ये शेतीचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे शनिवारी व रविवारी पाऊस झाला. पूर्व विदर्भ वगळता सर्वच जिल्ह्यांत पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

राज्यावर पुन्हा आस्मानी संकट; अवकाळीनं बळीराजाची चिंता वाढवली, राज्यात पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगरZero Hour Mahayuti: नव्या महायुती सरकारसमोर सर्वात मोठं आव्हान कोणतं असेल?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget